-
Chinchpoklicha Chintamani 2026: आज मुंबईतील लालबाग-परळ परिसरात ‘चिंचपोकळीच्या चिंतामणी’चा भव्य आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे.
-
मुंबईच्या गिरणगावातील (परळ-चिंचपोकळी) अत्यंत मानाचे आणि जगप्रसिद्ध असलेले ‘चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ’ (स्थापना: १९२०) यंदा २०२६ मध्ये आपल्या गणेशोत्सवाचे १०७ वे वर्ष थाटामाटात साजरे करत आहे.
-
चिंतामणीचा आगमन सोहळा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा, भव्य आणि शिस्तबद्ध सोहळा मानला जातो.
-
चिंतामणीची पहिली झलक पाहण्यासाठी परळ वर्कशॉपपासून ते चिंचपोकळी मंडपापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा लाखो भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे.
-
यंदाची चिंचपोकळीच्या चिंतामणीची विलोभनीय मूर्ती ‘कालगांध आर्ट्स’चे मूर्तिकार सिद्धेश दिघोळे यांनी साकारली आहे.
-
ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, पुष्पवृष्टी आणि “चिंतामणी मोरया” च्या जयघोषात ही भव्य मिरवणूक पुढे सरकत आहे.
-
गणेशोत्सवादरम्यान चिंतामणीच्या दर्शनासाठी २४ तास भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : चिंचपोकळीचा चिंतामणी/इन्स्टाग्राम)
इन्स्टाग्रामचा 80s फोटो ट्रेंड तुम्हाला फॉलो करायचाय? वापरा ChatGPT चे ‘हे’ सोपे Prompts