-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाच्या ज्येष्ठ नेत्या व खासदार सुप्रिया सुळे या महाराष्ट्रातील एक अभ्यासू आणि लोकाभिमुख राजकारणी म्हणून ओळखल्या जातात.
-
पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून त्यांनी १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे जाऊन महादेवाचे दर्शन घेतले.
-
या संपूर्ण धार्मिक दौऱ्याचे काही सुंदर आणि खास फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
-
श्रावणी सोमवारी त्यांनी मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करीत दर्शन घेतले आणि पूजा-अर्चा केली.
-
या भक्तिमय प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी पिवळ्या रंगाची पारंपरिक आणि आकर्षक साडी परिधान केली होती, ज्यामुळे त्यांचा लूक अतिशय प्रसन्न दिसत होता.
-
दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मंदिराच्या आवारात कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांसोबत काही छायाचित्रेदेखील काढली.
-
सोशल मीडियावर हे फोटो शेअर करीत त्यांनी ‘श्रावण महिन्यानिमित्त १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे जाऊन महादेवाचे दर्शन घेतले,’अशी सुंदर कॅप्शन दिली आहे.
-
त्यांच्या या पारंपरिक लूकची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू असून, चाहत्यांकडून फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (सर्व फोटो सौजन्य: सुप्रिया सुळे/इन्स्टाग्राम)
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास शरीरास कोणते फायदे मिळतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला