-
पवित्र श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी राज्यभरातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.
-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) युवा नेते अमित ठाकरे यांनी श्रावणी सोमवारचे औचित्य साधून भीमाशंकर येथे भेट दिली.
-
अमित ठाकरे यांनी आपल्या या भीमाशंकर दौऱ्याचे आणि पूजेचे खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत
-
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात पोहोचून अमित ठाकरे यांनी देवाधिदेव महादेवाचे अत्यंत श्रद्धेने आणि भावूकतेने दर्शन घेतले.
-
यावेळी त्यांनी शिवलिंगावर जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करत विशेष पूजा-अर्चा संपन्न केली.
-
या संपूर्ण पूजाविधीदरम्यान त्यांच्यासोबत मनसेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंवर मनसे कार्यकर्त्यांकडून व शिवभक्तांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अमित ठाकरे/इन्स्टाग्राम)
पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांची नवी इनिंग, गोव्यातल्या खासगी कंपनीत वैमानिक म्हणून कार्यरत