-
श्रावण महिना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो आणि या महिन्यात भगवान शंकाराची विशेष पूजा केली जाते.
-
याच श्रावणी सोमवारचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भगवान शिवावर रुद्राभिषेक केला आहे.
-
या पूजेसाठी अमृता फडणवीस यांनी पांढऱ्या रंगाची अतिशय सुंदर अशी पारंपरिक साडी नेसली होता.
-
सोशल मीडियावर अमृताजींच्या या नवीन आध्यात्मिक लूकची आणि त्यांच्या फोटोंची जोरदार चर्चा सुरू आहे.
-
फोटोंमध्ये त्या हातात तांब्याचा कलश घेऊन शिवपिंडीवर दूध आणि जल अर्पण करताना दिसत आहेत.
-
अमृता फडणवीस यांनी शिवपिंडीवर नारळाचे पाणी आणि पंचामृताचा अभिषेक करीत ही विशेष पूजा पूर्ण केली.
-
नेहमी चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस यांचा हा भक्तीमय आणि साधा अवतार चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अमृता फडणवीस/इन्स्टाग्राम)