-
श्रावण महिन्याचे आगमन होताच घरोघरी विविध सण-उत्सवांची लगबग सुरू होते आणि रक्षाबंधनाचा आनंद ओसरताच सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीचे वेध लागतात.
-
हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला गेलेला ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी’ हा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो.
-
याच खास मुहूर्तावर अमरावतीची प्रसिद्ध रांगोळी आर्टिस्ट साक्षी इंगळेने (Sakshi Ingle) तिच्या इन्स्टाग्राम पेजवर (rangolibysakshi_official) कृष्ण जन्माष्टमीनिमित्त काही अत्यंत सुंदर आणि आकर्षक रांगोळी डिझाइन्स शेअर केल्या आहेत.
-
साक्षीने साकारलेल्या या रांगोळ्यांमध्ये मटकी, बासरी, मोरपीस व ‘श्रीकृष्ण’ नाव अतिशय सुरेख व कलात्मक पद्धतीने रेखाटण्यात आले आहे.
-
तिच्या या अनोख्या रांगोळी डिझाइन्समुळे घराचे अंगण अधिक प्रसन्न आणि उत्सवी वातावरण निर्माण करण्यास मदत होईल.
-
सण-उत्सवांच्या काळात घरात सकारात्मक ऊर्जा आणि मंगलमय वातावरण तयार करण्यामध्ये अशा सुंदर कलाकृती महत्त्वाची भूमिका बजावतात.
-
साक्षीच्या या रांगोळी डिझाइन्स सोशल मीडियावर चांगल्याच पसंत केल्या जात असून, नेटकऱ्यांकडून त्यांचे भरभरून कौतुक होत आहे.
-
या वर्षी २०२६ मध्ये ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी’चा हा पावन सण शुक्रवार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी साजरा केला जाणार आहे.
-
धार्मिक पंचांगानुसार, अष्टमी तिथी ४ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे २:२५ वाजता सुरू होईल आणि ५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२:१३ वाजता समाप्त होईल.
-
(सर्व फोटो सौजन्य : साक्षी इंगळे/इन्स्टाग्राम)
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास शरीरास कोणते फायदे मिळतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला