-
भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या थोरल्या सूनबाई वैष्णवी महाडिक सध्या चर्चेत आल्या आहेत.
-
आपल्या खास लूक आणि स्टायलिश अंदाजामुळे त्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतात.
-
नुकतेच त्यांनी एका भव्य कार्यक्रमादरम्यान खास फोटोशूट केले आहे. रंगीबेरंगी फुलांची सजावट आणि आकर्षक पडद्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या सुंदर पोज दिल्या आहेत.
-
या फोटोशूटसाठी त्यांनी राखाडी रंगाची अत्यंत सुंदर डिझायनर एम्ब्रॉयडरी साडी नेसली आहे.
-
साडीवरील नाजूक नक्षीकाम आणि मॅचिंग वर्क असलेला ब्लाऊज त्यांच्या या लूकला अधिकच रॉयल बनवत आहे.
-
गळ्यात चोकर हार, कानात नाजूक कर्णफुले आणि हातातील बांगड्यांमुळे त्यांचा हा पारंपरिक लूक परिपूर्ण दिसत आहे.
-
केसांचा बांधलेला नीटनेटका अंबाडा आणि चेहऱ्यावरील सौम्य मेकअप त्यांच्या सौंदर्यात अधिक भर घालत आहे.
-
सोशल मीडियावर त्यांचे हे फोटो समोर येताच नेटकरी आणि चाहत्यांनी त्यांच्या या साडीवरील लूकला पसंती दर्शवली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: वैष्णवी महाडिक/इन्स्टाग्राम)
“नाना पाटेकरांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी गेले…”, अदिती सारंगधरने सांगितली भावुक आठवण; म्हणाली, “इतकं समाधान…”