-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी सहकुटुंब श्री त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar Shiva Temple) ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले.
-
या संदर्भातील काही फोटो त्यांनी स्वतः सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
हे फोटो शेअर करत त्यांनी “भगवान महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. हर हर महादेव!” असे कॅप्शन दिले आहे.
-
पवित्र श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे ‘बम बम भोले’च्या गजरात लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.
-
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्रावण महिन्यात ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला विशेष महत्त्व असल्याने मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असतात.
-
दरम्यान, बाळा नांदगावकर हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहयोगी मानले जातात.
-
बाळा नांदगावकर यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली. २००६ मध्ये जेव्हा राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली, तेव्हा त्यांच्यासोबत मनसेत सहभागी होणाऱ्या पहिल्या प्रमुख नेत्यांपैकी बाळा नांदगावकर एक होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : बाळा नांदगावकर/इन्स्टाग्राम)
चपातीला तूप लावून खाल्ल्यानं कोणते आजार बरे होतात? त्याचे फायदे जाणून घ्या