-
यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी शुक्रवारी, ४ सप्टेंबर २०२६ रोजी साजरी केली जाणार असून, दुसऱ्या दिवशी शनिवारी, ५ सप्टेंबर २०२६ रोजी ‘दहीहंडी’ (गोपाळकाला) चा उत्साहात सण रंगणार आहे.
-
हिंदू पंचांगानुसार, भगवान श्रीकृष्णांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला, मध्यरात्री रोहिणी नक्षत्रात झाला होता.
-
सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि दिवसभर उपवास ठेवून श्रीकृष्णाचे ध्यान करावे.
-
मध्यरात्री १२ वाजता कृष्णजन्माचा सोहळा साजरा करून आरती करावी आणि बाळकृष्णाला पाळण्यात झुलवावे.
-
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी किंवा पूजेच्या वेळी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते. पूजेच्या वेळी लाल, पिवळे किंवा हिरवे कपडे घालणे शुभ मानले जाते.
-
या दिवशी घरात मांसाहार आणि मद्यपान अजिबात करू नये. केवळ सात्त्विक अन्नाचाच वापर करावा.
-
या दिवशी घरात किंवा बाहेर कोणाशीही वाद घालू नका, रागवू नका आणि कोणाचाही अपमान करू नका.
-
उपवासाच्या नियमांनुसार या दिवशी नखे आणि केस कापणे टाळावे.
iPhone 18 Launch: मोठी खुशखबर! iPhone 18 Pro ची किंमत ऐकून व्हाल थक्क; Pro Max साठी मोजावे लागणार फक्त ‘इतके’ रुपये