-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुटुंबात नव्या पाहुणीचे आगमन झाले असून, संपूर्ण ‘शिवतीर्थ’ बंगल्यावर आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.
-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे दुसऱ्यांदा पिता झाले आहेत.
-
अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
-
मिताली आणि अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक खास डिजिटल कार्ड शेअर करून, या गोड बातमीची अधिकृत माहिती दिली.
-
शेअर केलेल्या पोस्टमध्ये कियानला लहान बहीण आल्याचा उल्लेख असून, ०७.०९.२६ ही तिच्या जन्माची तारीख दर्शविण्यात आली आहे.
-
अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे हे २७ जानेवारी २०१९ रोजी विवाहबंधनात अडकले होते. या दाम्पत्याला आधी ‘कियान’ नावाचा एक मुलगा असून, आता त्याच्या पाठीवर छोटी बहीण आली आहे.
-
सोशल मीडियावर ही बातमी समोर येताच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून ठाकरे कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: मिताली ठाकरे/इन्स्टाग्राम)
“…तर मनापासून माफी मागतो”, येरवडा कारागृहातून सुटकेनंतर संतोष पंडित म्हणाले, “मी संवैधानिक अधिकार…”