-
आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
-
नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर एक विशेष पोस्ट शेअर केली आहे.
-
पोस्ट शेअर करत अमृता फडणवीस यांनी लिहिले आहे की, “आपले आदरणीय पंतप्रधान श्री @narendramodi जी यांच्या वाढदिवसाच्या पवित्र प्रसंगी आज शास्त्रोक्त पद्धतीने गणेशपूजन करून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली.”
-
त्यांनी पुढे कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “तसेच येणाऱ्या वर्षांतही ते देशवासीयांच्या सेवेसाठी अशाच प्रकारे समर्पित राहावेत, याकरिता श्रद्धेचा एक दिवा प्रज्वलित केला.”
-
गणेशोत्सवाच्या या पवित्र काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी वर्षा बंगल्यावर खास पूजा-अर्चा करण्यात आली.
-
सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांनी शेअर केलेली ही खास पोस्ट आणि फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अमृता फडणवीस/इन्स्टाग्राम)
भारताचा पाकिस्तानवर एका विकेटने रोमहर्षक विजय! U19 आशिया चषक चॅम्पियन ठरले; १ चेंडू ३ धावांची गरज अन्…; मोहितने कसा जिंकून दिला सामना?