-
प्रसिद्ध पात्रे, लोकप्रिय चित्रपट आणि थीम पार्क्सच्या मागे डिस्नेचा इतिहास अनेक रंजक कथांनी भरलेला आहे. डिस्नेबद्दलच्या काही अनोख्या गोष्टी जाणून घेऊया..
-
मिकी माऊस डिस्नेचा पहिला स्टार नव्हता: मिकी माऊसआधी १९२७ मध्ये वॉल्ट डिस्ने यांनी ‘ऑस्वॉल्ड द लकी रॅबिट’ (Oswald the Lucky Rabbit) हे पात्र तयार केले होते. युनिव्हर्सल स्टुडिओसोबत वाद झाल्यामुळे डिस्नेने या पात्राचे हक्क गमावले आणि त्यानंतर त्यांनी मिकी माऊसची निर्मिती केली.
-
मिकीचे पहिले शब्द होते “हॉट डॉग!”: सुरुवातीच्या कार्टून्समध्ये मिकी फक्त शिट्टी वाजवायचा किंवा हसायचा. १९२९ मधील ‘द कार्निव्हल किड’ या लघुपटात तो पहिल्यांदा बोलला, जिथे त्याचे पहिले शब्द “हॉट डॉग!” हे होते.
-
स्नो व्हाईटला म्हटले गेले “डिस्नेचा वेडेपणा”: ‘स्नो व्हाईट अँड द सेव्हन ड्वार्फ्स’ हा पहिला पूर्ण लांबीचा ॲनिमेटेड चित्रपट बनवताना लोकांनी वॉल्ट डिस्ने यांच्या कल्पनेवर शंका घेतली होती. हा चित्रपट बनवायला ३ वर्षे लागली आणि पैशांसाठी वॉल्ट यांना आपले घरही गहाण ठेवावे लागले होते. अखेर १९३७ मध्ये हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला.
-
एपकॉट (Epcot) हे थीम पार्क नसून एक शहर बनणार होते: वॉल्ट डिस्ने यांना एपकॉट हे एक भविष्यातील हाय-टेक शहर म्हणून वसवायचे होते, जिथे लोक राहतील आणि नवीन तंत्रज्ञानाचा अनुभव घेतील. परंतु १९६६ मध्ये त्यांच्या निधनानंतर या योजनेचे रूपांतर थीम पार्कमध्ये करण्यात आले.
-
डिस्नेलँडमधील वॉल्ट डिस्ने यांचे गुपित अपार्टमेंट: डिस्नेलँडमधील अग्निशमन केंद्राच्या वर वॉल्ट डिस्ने यांचे एक खाजगी अपार्टमेंट होते. तेथून ते पार्कमधील पर्यटकांना पाहत असत. आज ही त्यांच्या आठवणीत त्या अपार्टमेंटच्या खिडकीतील दिवा नेहमी सुरू ठेवला जातो.
-
‘स्नो व्हाईट’साठी मिळाला होता एक खास ऑस्कर: १९३९ मध्ये ‘स्नो व्हाईट’ चित्रपटाच्या यशासाठी वॉल्ट डिस्ने यांना एक विशेष ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. यामध्ये एक पूर्ण आकाराचा ऑस्कर आणि सोबत सात बुटक्यांची (Seven Dwarfs) आठवण म्हणून ७ लहान ऑस्कर पुतळे देण्यात आले होते.
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारासह इतर लाभही वाढणार? आठव्या वेतन आयोगाचे १ ऑक्टोबरचे परिपत्रक चर्चेत