-
भारतीय स्वयंपाकघरात लसूण फोडणी देण्यासाठी आणि जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरला जातो. जवळपास प्रत्येक स्वयंपाकघरात लसणाचा वापर होतो. फोडणी आणि पेस्टपासून, तर चटणी बनवण्यापर्यंत लसणाचा वापर केला जातो.
-
कोणत्याही पदार्थाची चव बदलायची असेल, तर त्यात लसूण टाका. आरोग्याच्या दृष्टीनेही तो अतिशय फायदेशीर मानला जातो. त्यात अनेक पोषक तत्त्वे आढळतात; पण तुम्हाला माहीत आहे का की, भारतात सर्वांत जास्त लसणाची शेती कुठे होते आणि कोणत्या शहराला ‘गार्लिक सिटी’ म्हणतात?
-
खरं तर, भारतात सर्वांत जास्त लसणाची शेती मध्य प्रदेशात होते. हे राज्य देशातील एकूण लसूण उत्पादनापैकी सुमारे ६३% लसूण पिकवते.
-
मध्य प्रदेशातील मंदसौर या शहराला भारताचे ‘लसूण शहर’ म्हटले जाते. येथे खूप मोठ्या प्रमाणावर लसणाचे उत्पादन आणि व्यापार होतो.
-
लसूण हे मंदसौरचे ‘वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट’ (ODOP) म्हणजेच ‘एक जिल्हा एक उत्पादन’ अंतर्गत निवडलेले मुख्य पीक आहे. येथील अनेक शेतकऱ्यांसाठी लसूण हे उत्पन्नाचे एक मोठे साधन आहे.
-
मंदसौरमध्ये पिकणारा लसूण आपल्या तिखट चवीसाठी, चांगल्या दर्जाच्या पाकळ्यांसाठी आणि दीर्घकाळ टिकण्याच्या गुणांसाठी ओळखला जातो.
-
येथील लसणाला तीव्र सुवास असतो आणि त्यात तेलाचे प्रमाण जास्त असते. येथे लसणाचा वापर लसूण पावडर, लसणाचे तेल, पेस्ट, लोणचे व सुके फ्लेक्स यांसारखे पदार्थ बनवण्यासाठीदेखील केला जातो.
-
मध्य प्रदेशव्यतिरिक्त लसणाचे उत्पादन राजस्थान, उत्तर प्रदेश व गुजरात या राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर होते.
“पती-पत्नी म्हणून आमचं नातं टिकू शकलं नाही”, विजय केंकरेंपासून घटस्फोट घेतल्यानंतर आलेल्या अनुभवांबद्दल रेणुका शहाणे म्हणाल्या, “वेगळं होणं…”