-
आंध्र प्रदेशातील खाद्यसंस्कृती म्हणजे केवळ तिखट-झणझणीत पदार्थ नव्हेत, तर त्यात याहूनही बराच मोठा चवींचा खजिना दडला आहे. चटकदार लोणच्यांपासून ते तृप्त करणाऱ्या भाताच्या प्रकारांपर्यंत, हे काही दुर्लक्षित पदार्थ आंध्रच्या खाद्यसंस्कृतीतील समृद्धता, चवींचा समतोल आणि प्रादेशिक विविधता दाखवून देतात.
-
गोंगुरा ममसम (Gongura Mamsam): गोंगुरा (अंबाडीची / सॉरेलची पाने) वापरून बनवलेली ही एक आंबट-तिखट मटण करी. गोंगुराची तीव्र आंबट चव मांसाच्या समृद्ध चवीला अप्रतिम समतोल देते. (फोटो : शाझियाज किचन/यूट्यूब)
-
गुत्ठी वांग्या कुरा (Guttikaya Kura): लहान वांग्यांमध्ये शेंगदाणे अन् मसाल्यांची घट्ट पेस्ट भरून मंद आचेवर शिजवलेली ही एक सुरेख भाजी. शेंगदाण्याच्या खमंग आणि दाट चवीमुळे हा पदार्थ नक्कीच चाखून बघायला हवा. (फोटो : श्रावणीज किचन/यूट्यूब)
-
कोडी वेपुडू (Kodi Vepudu): कढीपत्ता आणि झणझणीत मसाल्यांमध्ये परतलेला हा एक सुका चिकनचा पदार्थ. स्टार्टर किंवा वाफाळलेल्या भातासोबत खाण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. (विकिमीडिया कॉमन्स)
-
पेसरट्टू उपमा (Pesarattu Upma): हिरव्या मुगापासून बनवलेला प्रथिनयुक्त (Protein-rich) डोसा, ज्याच्या आत मऊ उपमा भरून वाढला जातो. हा पदार्थ पौष्टिक, पोटभरीचा आणि तरीही पचायला हलका असतो. (विकिमीडिया कॉमन्स)
-
पुलिहोरा (Pulihora): चिंच, शेंगदाणे आणि खमंग फोडणी देऊन बनवलेला आंबट-गोड भाताचा प्रकार. सणासुदीच्या काळात विशेष बनवला जाणारा हा भात साधा असला, तरी अत्यंत चवदार लागतो. (अनस्प्लॅश)
-
रोय्याला इगुरु (Royyala Iguru): कांदा, टोमॅटो आणि तिखट मसाल्यांच्या लज्जतदार ग्रेव्हीमध्ये शिजवलेली घट्ट कोळंबीची करी. गरम भात आणि साजूक तुपासोबत ही करी अप्रतिम लागते. (फोटो : यामी टॉक्स/यूट्यूब)
शिवाजी पार्क आंदोलनानंतर तक्रार दाखल होताच अभिजित दिपके यांचे प्रत्युत्तर; म्हणाले…