-
देवभूमी हिमाचल प्रदेश आपल्या निसर्गरम्य पर्वतांसाठी, जंगलांसाठी आणि हिरव्यागार कुरणांसाठी प्रसिद्ध आहे. या जंगलांमध्ये प्राण्यांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती आढळतात. हिमाचल प्रदेशात आढळणाऱ्या काही खास वन्यजीवांची माहिती खालीलप्रमाणे:
-
हिम बिबट्या
हिम बिबट्या हा हिमाचल प्रदेशचा राज्य प्राणी असून तो स्पीती, पिन व्हॅली, किन्नौर, लाहौल आणि पांगी यांसारख्या उंच पर्वतीय भागात आढळतो. -
हिमालयन मोनल
हिमालयन मोनल हा पक्षी आपल्या हिरव्या, निळ्या, जांभळ्या आणि तांब्युस रंगांच्या चमकदार पंखांमुळे अत्यंत आकर्षक दिसतो. -
हिमालयन आयबेक्स
हिमालयन आयबेक्स ही मोठ्या व वदार शिंगांची रानबोकडाची प्रजाती असून ती उंच, खडकाळ पर्वतांवर सहज वावरू शकते. -
वेस्टर्न ट्रॅगोपॅन (ज्युज्युराना)
‘ज्युज्युराना’ म्हणून ओळखला जाणारा वेस्टर्न ट्रॅगोपॅन हा दुर्मिळ पक्षी पश्चिम हिमालयातील घनदाट जंगलांमध्ये आढळतो. -
ब्लू शीप (भरल)
भरल हा करड्या-निळ्या रंगाचा जंगली प्राणी खडकाळ डोंगराळ भागात सहजपणे लपून राहू शकतो. -
हिमालयन तहर
हिमालयन तहर हा घनदाट केस असलेला मोठा रानबोकड असून त्याचे केस त्याला अतिथंड हवामानात उबदार ठेवतात. -
हिमालयन कस्तुरी मृग
हिमालयन कस्तुरी मृग हा उंच जंगलांत राहणारा, आकाराने लहान आणि अतिशय लाजाळू स्वभावाचा दुर्मिळ हरीण आहे.
राज ठाकरेंच्या नातीचे थाटात नामकरण; अमित ठाकरेंनी कन्येचे ठेवले ‘हे’ ऐतिहासिक नाव