-
भारतातील ऐतिहासिक अन् प्राचीन अशा या गुंफांविषयी अनेक प्राचीन कथा ऐकायला मिळतात. परंतु,भारतातील ’गुंफांचे शहर’ म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण नेमके कोणते, ते जाणून घेऊया…
-
मुंबईतील एका बेटावर जाण्यासाठी नावेचा आधार घ्यावा लागतो, जिथे समुद्राच्या मध्यभागी हिरव्यागार टेकड्या दिसतात आणि या टेकड्यांच्या आत खडक कोरून प्राचीन मंदिरे व अवाढव्य मूर्ती घडवल्या गेल्या आहेत.
-
घारापुरी ही प्रसिद्ध लेणी ज्या ठिकाणी आहेत, त्या एलिफंटा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बेटाला ‘गुंफांचे शहर’, असे म्हटले जाते. हे बेट खडक कोरून तयार केल्या गेलेल्या प्राचीन गुंफांसाठी प्रसिद्ध आहे आणि तेथील बहुतांश गुहा भगवान शिवाला समर्पित केल्या गेल्या आहेत.
-
युनेस्कोनुसार, या घारापुरी बेटावरील मानवी वावर इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकापासून आढळतो. तर, सध्याच्या कातळातील गुहांची निर्मिती मुख्यत्वे पाचव्या ते सहाव्या शतकादरम्यान झाली असावी, असे मानले जाते.
-
येथील अवाढव्य दगडी मूर्ती हे या गुंफांचे मुख्य वैशिष्ट्य आहे. त्यामधील नटराज, अर्धनारीश्वर व सदाशिव यांसारख्या भगवान शिवाची विविध रूपे अन् त्यासंबंधीच्या कथा येथे नक्षीकामाद्वारे अधोरेखित केल्या गेल्या असल्याचे पाहायला मिळते.
-
या गुंफांमधील भव्य त्रिमूर्ती येथे सर्वाधिक प्रसिद्ध आहे. या मूर्तीमध्ये आपल्याला शिवाचे तीन चेहरे दिसतात. ही त्रिमूर्ती एलिफंटा बेटावरील सर्वांत महत्त्वाची कलाकृती मानली जाते.
-
अत्यंत कठीण अशा बॅसाल्ट खडकांपासून तयार केल्या गेलेल्या या गुंफांमध्ये भव्य खांब, मंडप, मूर्ती आणि कातळावर केलेले नाजूक नक्षीकाम पाहायला मिळते.
-
(फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
मराठमोळे महेश भागवत हैदराबादचे पोलीस आयुक्त, विश्वास नांगरे पाटील यांनी लिहिली खास पोस्ट