-
Happy Birthday Sara Tendulkar: भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि डॉ. अंजली तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकरचा १२ ऑक्टोबर रोजी वाढदिवस पार पडला.
-
साराच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तिची वहिनी सानिया चंडोकने (Saaniya Chandhok) सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली.
-
सानियाने सारासोबतचे फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि तिचे प्रेम व्यक्त केले.
-
या पोस्टवरून सारा आणि सानिया यांच्यातील सुंदर व घट्ट नाते स्पष्टपणे दिसून येते.
-
सानियाने शेअर केलेली ही पोस्ट आणि साराचा वाढदिवस सध्या सोशल मीडियावर चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.
-
साराने लंडनच्या ‘युनिव्हर्सिटी कॉलेज’मधून (UCL) वैद्यकीय क्षेत्रातील (Medical Science) शिक्षण पूर्ण केले आहे.
-
सारा सोशल मीडियावर कमालीची लोकप्रिय असून, तिच्या खास फॅशन स्टाइल आणि मॉडेलिंग प्रोजेक्ट्समुळे ती नेहमीच चर्चेत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : सानिया चंडोक/इन्स्टाग्राम)
दीडशे किलो बटाटे, चटणीची खास रेसिपी- चेंबूरच्या नंदू वडापावची गोष्ट!