-
सँडविच बनवताना कोणतेही कडक नियम नसतात; पण इतिहास चाळला तर लोकांनी या स्वातंत्र्याचा अतिशय विचित्र पद्धतीने वापर केल्याचे दिसते. ऐतिहासिक नोंदींनुसार पूर्वीच्या काळात लोक आवडीने खायचे अशा ६ विचित्र सँडविचेसची माहिती खालीलप्रमाणे…
-
ऑयस्टर सँडविच (Oyster Sandwich): १९व्या शतकात अमेरिकेत हे सँडविच खूप प्रसिद्ध होते. यात बारीक कापलेले कच्चे ऑयस्टर (शिंपल्यातील सीफूड) लिंबाचा रस, तेल आणि मसाल्यांमध्ये एकत्र केले जायचे. हे मिश्रण सॅलडच्या पानांसोबत ब्रेडवर पसरवून खाल्ले जायचे.
-
लोणच्याचे सँडविच (Pickle Sandwich): हे केवळ साधे लोणचे नसून एक वेगळाच प्रकार होता. यात लोणच्याचे तुकडे, व्हिप्ड क्रीम, मेयोनिज, हॉर्सरॅडिश (तिखट मुळा) आणि शिजवलेले बीफ एकत्र करून एक मलईदार सारण तयार केले जायचे.
-
पॉपकॉर्न सँडविच (Popcorn Sandwich): १९०० च्या सुरुवातीच्या रेसिपी पुस्तकांमध्ये आढळणारा हा एक अत्यंत विचित्र प्रकार आहे. यात पॉपकॉर्न, सार्डिन मासे, टोमॅटो केचप आणि वर्चेस्टरशायर सॉस एकत्र वाटून त्याची पेस्ट बनवली जायची; आणि ती टोस्ट केलेल्या ब्रेडवर लावली जायची.
-
टोस्ट सँडविच (Toast Sandwich): नावाप्रमाणेच, यात ब्रेडच्या दोन स्लाईसच्या मध्ये टोस्ट केलेला ब्रेडचा तुकडा ठेवला जायचा. यात चवीसाठी फक्त थोडे मीठ आणि काळी मिरी पूड घातली जायची.
-
यीस्ट सँडविच (Yeast Sandwich): १९३० च्या दशकात यीस्टला आरोग्यदायी अन्न म्हणून प्रोत्साहन दिले जात होते. लोक कॉम्प्रेस्ड यीस्ट आणि सॉसची पेस्ट बनवून ब्रेडवर लावून खायचे. मात्र, ही चव फारशी कोणाला आवडली नाही आणि हा प्रकार जास्त काळ टिकला नाही.
-
मॅश्ड पोटॅटो सँडविच (Mashed Potato Sandwich): हा भरपूर कार्बोहायड्रेट्स असलेला प्रकार होता. यात बटर लावलेल्या ब्रेडवर उकडलेले व कुस्करलेले बटाटे, कांदा आणि मेयोनिज घालून तो ब्रेड टोस्ट केला जायचा. हे सँडविच प्रसिद्ध अभिनेते व डान्सर जीन केली यांच्याशी जोडले गेले होते.
हृदयरोगतज्ज्ञ शिरीष हिरेमठ यांचे निधन; हृदयरोग उपचार क्षेत्रातील दिग्गज हरपला