-
भाजपाचे खासदार धनंजय महाडिक हे महाराष्ट्रातील आणि विशेषतः कोल्हापूरच्या राजकारणातील एक प्रबळ नेते म्हणून ओळखले जातात.
-
त्यांचे चिरंजीव विश्वराज आणि सून मंजिरी (अंजली) महाडिक यांच्या घरी ६ मे रोजी एका चिमुकल्या गोड कन्यारत्नाचे आगमन झाले.
-
महाडिक कुटुंबात नव्या चिमुकलीच्या आगमनाने अत्यंत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या लहान बाळाचे नाव ‘याशिका’ असे ठेवण्यात आले आहे.
-
याशिकाच्या आगमनानंतर पहिल्यांदाच आलेल्या नवरात्रोत्सवाच्या शुभमुहूर्तावर महाडिक कुटुंबाने करवीर निवासिनी श्री आई अंबाबाई देवीचे सहकुटुंब दर्शन घेतले.
-
या मंगलप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, त्यांच्या पत्नी, सून आणि नात याशिका यांच्यासह संपूर्ण कुटुंब अंबाबाईच्या चरणी नतमस्तक झाले.
-
फोटोंमध्ये खासदार धनंजय महाडिक आपल्या लहानग्या नातीला ‘याशिका’ला हातात पकडून आनंदाने अंबाबाईच्या गाभाऱ्यासमोर कुटुंबासमवेत उभे असल्याचे दिसत आहे.
-
महाडिक यांनी या दर्शनाचे हे सुंदर क्षण सोशल मीडियावर शेअर केले असून, नेटकरी या फोटोंवर पसंती दर्शवत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: धनंजय महाडिक/इन्स्टाग्राम)
राज ठाकरेंच्या नातीचे थाटात नामकरण; अमित ठाकरेंनी कन्येचे ठेवले ‘हे’ ऐतिहासिक नाव