-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याची पत्नी सानिया तेंडुलकर हिने तिच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे.
-
लग्नानंतर सानिया तेंडुलकर हे नाव सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असते आणि तिची प्रत्येक पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
-
तिच्या ग्लॅमरस लूक आणि हटके जीवनशैलीमुळे तिची सोशल मीडियावर नेहमीच मोठी चर्चा रंगलेली पाहायला मिळते.
-
वडिलांच्या वाढदिवसानिमित्त सानियाने तिच्या लहानपणीचा वडिलांसोबतचा एक अत्यंत गोड आणि आठवणीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
हा बालपणातील फोटो शेअर करत तिने ‘Happy birthday, Dad’ अशी सुंदर आणि प्रेमळ कॅप्शन देत आपल्या वडिलांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
-
सानियाच्या वडिलांचे नाव सनी चंडोक (Sunny Chandhok) असून तिच्या आईचे नाव गौरिका घई चंडोक (Gaurika Ghai Chandhok) असे आहे.
-
सानियाचे आई-वडील दोघेही त्यांच्या कौटुंबिक आणि मोठ्या उद्योगांशी थेट जोडलेले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य:सानिया तेंडुलकर/ इन्स्टाग्राम)
राज ठाकरेंच्या नातीचे थाटात नामकरण; अमित ठाकरेंनी कन्येचे ठेवले ‘हे’ ऐतिहासिक नाव