-
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) सध्या इटलीच्या सफरीवर आहे.
-
साराने तिच्या इटली ट्रिपमधील काही सुंदर फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या ट्रिपदरम्यान साराने इटलीतील मिलान शहरातील प्रसिद्ध ठिकाणे, तिथली कला, संस्कृती, फॅशन आणि खाद्यसंस्कृतीचा मनापासून आनंद घेतला.
-
मिलानमधील प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू ‘दुआमो दी मिलानो’ (Duomo di Milano) आणि तिथल्या नयनरम्य परिसराला तिने भेट दिली.
-
याशिवाय इटालियन कॅफे कल्चर, स्थानिक खाद्यपदार्थ आणि मिलानच्या समृद्ध कला-संस्कृतीचा तिने अनुभव घेतला.
-
मिलान हे जगातील फॅशनचे प्रमुख केंद्र मानले जाते, त्यामुळे सारादेखील येथे अत्यंत स्टायलिश लूकमध्ये दिसून आली.
-
साराने नुकताच १२ ऑक्टोबर रोजी तिचा २९ वा वाढदिवस साजरा केला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : सारा तेंडुलकर/इन्स्टाग्राम)
प्रचंड पैसा, नवं घर, जमीन खरेदी! २०२७ पर्यंत या राशींची सर्व स्वप्न होणार पूर्ण; मंगळाच्या आशिर्वादाने उत्पन्नाचे मार्ग वाढणार