-
Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela: नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची शनिवारी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी ध्वजारोहणाने औपचारिक सुरुवात झाली.
-
नाशिक येथील रामकुंड परिसरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
-
कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचा मान एखाद्या महिला राष्ट्रपतींना मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
-
ध्वजारोहणापूर्वी राष्ट्रपती मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत धर्मध्वज पूजन, गंगापूजन तसेच ध्वजस्तंभ पूजन यांसारखे धार्मिक विधी पार पडले.
-
रामकुंड परिसरात मुख्य धर्मध्वजासोबतच श्री गंगा-गोदावरी मंदिरावरही ध्वजारोहण करण्यात आले.
-
रामकुंड येथे उभारलेला मुख्य धर्मध्वज स्तंभ ५१ फूट उंच असून तो पंचधातूंपासून तयार करण्यात आला आहे.
-
या स्तंभावर समुद्रमंथनातून बाहेर आलेल्या १४ रत्नांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. तसेच, अमृत कलश धारण केलेल्या गरुडाचे चित्रही त्यावर कोरण्यात आले आहे.
-
दुसरा धर्मध्वज स्तंभ श्री गंगा-गोदावरी मंदिरा जवळ उभारण्यात आला आहे. ३१ फूट उंचीचा हा स्तंभदेखील पंचधातूचाच आहे.
-
सायंकाळी नाशिकमधील रामकुंड परिसरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६,५०० आदिवासी बांधवांच्या सहभागातून भव्य महा गोदाआरती पार पडणार आहे.
१ नोव्हेंबर पंचांग : नवीन महिन्यात होणार नव्या गोष्टींची सुरुवात! घरात आनंदवार्ता ते आर्थिक लाभाचे योग; वाचा तुमचे राशिभविष्य