-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मिताली ठाकरे यांना गेल्या ७ सप्टेंबर रोजी कन्यारत्न प्राप्त झाले होते.
-
कन्यारत्नाच्या आगमनानंतर आज १ नोव्हेंबर रोजी ठाकरे कुटुंबात मोठ्या उत्साहात आणि आनंदात बारशाचा कार्यक्रम संपन्न झाला.
-
या खास कौटुंबिक सोहळ्याला ठाकरे कुटुंबातील सर्व प्रमुख सदस्य, जवळचे नातेवाईक आणि आप्तेष्ट उपस्थित होते.
-
बारशाच्या पारंपरिक आणि मंगलमय सोहळ्यात राज ठाकरेंच्या नातीचे ‘अहिल्या’ हे ऐतिहासिक महत्त्व असलेले नाव ठेवण्यात आले.
-
अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा विवाह २७ जानेवारी २०१९ रोजी अत्यंत शाही पद्धतीने पार पडला होता.
-
लग्नानंतर काही वर्षांनी ठाकरे कुटुंबात छोट्या पाहुण्याचे आगमन झाले असून या दांपत्याला आधी ‘कियान’ नावाचा एक गोंडस मुलगा आहे.
-
अहिल्याच्या रूपाने ठाकरे घराण्यात आलेल्या या चिमुकल्या परीमुळे संपूर्ण कुटुंबात सध्या मंगलमय आणि आनंदी वातावरण पसरले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य:मिताली ठाकरे/ इन्स्टाग्राम)
Zee Marathi Awards : आदर्श नवरा समर! तेजश्री प्रधानला मिळाले ‘हे’ तीन पुरस्कार, Zee 5 ची सर्वोत्कृष्ट मालिका ठरली…