-
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) आणि ज्येष्ठ पत्रकार निधी राझदान (Nidhi Razdan) यांचा नुकताच विवाहसोहळा पार पडला.
-
सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी आपल्या या नव्या प्रवासाची घोषणा केली.
-
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ओमर अब्दुल्ला व निधी राझदान यांच्या विवाहसोहळ्याला विशेष हजेरी लावली होती.
-
ओमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लग्नाचे फोटो पोस्ट करत “A New Journey Began Yesterday” (कालपासून एका नव्या प्रवासाची सुरुवात झाली) असे लिहिले आहे.
-
हा विवाह सोहळा नवी दिल्ली येथे ‘स्पेशल मॅरेज ॲक्ट’नुसार पार पडला.
-
या सोहळ्याला ओमर अब्दुल्ला यांचे वडील डॉ. फारूक अब्दुल्ला, आई मॉली अब्दुल्ला यांच्यासह निधी राझदान यांचे कुटुंब आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते.
-
निधी राझदान यांचा जन्म ११ एप्रिल १९७७ रोजी झाला असून त्यांचे कुटुंब मूळचे जम्मू-काश्मीरच्या बडगाव येथील कश्मीरी पंडित आहे.
-
सर्वोच्च न्यायालयाने तीन महिन्यांपूर्वीच ओमर अब्दुल्ला आणि त्यांच्या माजी पत्नी पायल अब्दुल्ला यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली होती. त्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी निधी राझदान यांच्याशी लग्न करत आपल्या नव्या नात्याची घोषणा केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुप्रिया सुळे आणि ओमर अब्दुल्ला/इन्स्टाग्राम)
US Midterm Elections 2026 Results Live Updates: अमेरिकेत मध्यावधी निवडणुकांची धामधूम; ट्रम्प यांची राजकीय परीक्षा, निकाल काय?