-
अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने (CJP) आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीत विविध क्षेत्रांतील महत्त्वाच्या राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती.
-
या खास स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात अनेक दिग्गज राजकीय चेहरे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
-
सौरव दास यांनी या दिवाळी पार्टीचे काही खास क्षणचित्रे आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
-
प्रसिद्ध केलेल्या फोटोंमध्ये आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर सौरव दास सोफ्यावर बसून हास्यविनोद करताना दिसत आहेत.
-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनीही या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
-
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव हेदेखील या पार्टीत उपस्थित होते आणि ते सौरव दास यांना आपुलकीने मिठी मारताना दिसून आले.
-
ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी देखील या दिवाळी पार्टीत सहभागी होऊन नेत्यांशी संवाद साधला.
-
याशिवाय कार्यक्रमात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा आणि इतर अनेक मान्यवर नेते एकत्र आलेले पाहायला मिळाले.
-
सौरव दास यांनी शेअर केलेले हे सर्व फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य:सौरव दास/ इन्स्टाग्राम)
राज ठाकरेंच्या नातीचे थाटात नामकरण; अमित ठाकरेंनी कन्येचे ठेवले ‘हे’ ऐतिहासिक नाव