-
काल १ नोव्हेंबर रोजी रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांचा ६३ वा वाढदिवस साजरा झाला.
-
त्यांनी या वयातही तरुणाईला लाजवेल अशा रीतीने राखलेल्या तंदुरुस्तीचे रहस्य त्यांच्या शिस्तबद्ध जीवनशैली आणि शुद्ध शाकाहारी आहारात दडलेले आहे.
-
वय हे तंदुरुस्तीच्या मार्गात अडथळा ठरू शकत नाही, हे नीता अंबानी यांनी आपल्या नियमित दिनचर्येतून सिद्ध केले आहे.
-
त्या आठवड्यातून पाच ते सहा दिवस नियमितपणे व्यायाम करतात आणि दररोज पाच ते सात हजार पावले चालतात.
-
लहानपणापासून भरतनाट्यम शिकलेल्या नीता अंबानी यांच्या व्यायामाच्या दिनचर्येत लेग डे (पायांचे व्यायाम) हा त्यांचा सर्वांत आवडता भाग आहे.
-
व्यायामात वैविध्य ठेवण्यासाठी त्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांच्या व्यायामासोबतच स्विमिंग, ॲक्वा एक्सरसाइज आणि नृत्याचा समावेश करतात.
-
व्यायामाकडे एक सक्तीचे काम म्हणून न बघता, तो मनाला शांती आणि आनंद देणारा घटक मानून, त्या दैनंदिन वर्कआउट करत असतात.
-
त्या संपूर्णपणे शाकाहारी असून, त्यांच्या दैनंदिन आहारात केवळ संतुलित, सेंद्रिय (ऑरगॅनिक) आणि नैसर्गिक अन्नाचा समावेश असतो.
-
शाकाहारी आहारात शरीराला आवश्यक प्रथिने (प्रोटीन) घेण्यावर त्या भर देतात आणि साखर, तसेच साखरेचे पर्याय पूर्णपणे टाळतात.
-
वयाच्या ३० नंतर महिलांचे स्नायू, हाडांची घनता आणि शक्ती कमी होत असल्याने सर्व महिलांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे, असा सल्ला त्या देतात.
राज ठाकरेंच्या नातीचे थाटात नामकरण; अमित ठाकरेंनी कन्येचे ठेवले ‘हे’ ऐतिहासिक नाव