-
उद्योजिका व NMACC च्या संस्थापक नीता अंबानी या रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा असून, त्या नेहमीच त्यांच्या पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण साड्यांमुळे चर्चेत असतात.
-
रिलायन्स दीपावली उत्सवाच्या औचित्याने आयोजित विशेष कार्यक्रमात नीता अंबानी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
या उत्सवासाठी त्यांनी स्वदेश ब्रँडची खास पारंपरिक लाल रंगाची रामावली बनारसी साडी नेसली होती.
-
आपला पारंपरिक लूक अधिक खुलवण्यासाठी त्यांनी गळ्यात सोन्याचा हार आणि कर्णफुले परिधान केले होते.
-
हातांमध्ये नाजूक बांगड्या आणि कड्यांसह त्यांनी दोन्ही हातांत सुवासिक फुलांचा गजरा माळला होता.
-
केसांची सुंदर अंबाडा (बन) रचना करून त्यात लाल गुलाबाची फुले माळल्यामुळे त्यांचा लूक अतिशय देखणा दिसत होता.
-
हातात तेवणारा दिवा धरून काढलेले त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: स्वदेश/इन्स्टाग्राम)
Diwali Wishes: दिन दिन दिवाळी! दिवाळीनिमित्त प्रियजनांना पाठवा ‘या’ खास मराठी शुभेच्छा, सोशल मीडियावर शेअर करा हटके PHOTOS