नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर लगेचच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार यांचा राजीनामा घेतला. अजय कुमार यांनी राजीनामा देऊन आता ३ महिने झाले तरी त्यांच्या जागी अजूनही नवी नियुक्ती करण्यात आलेली नाही. यामुळे उत्तर प्रदेश कॉंग्रेसमध्ये चिंता आणि नाराजी दोन्ही वाढत आहेत. प्रियांका गांधी या उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी आहेत. 

१३ ते १५ मे दरम्यान उदयपूर येथे आयोजित ‘काँग्रेस चिंतन शिबिरा’च्या आधी नवीन उत्तर प्रदेशाध्यक्ष नेमला जाईल अशी अपेक्षा येथील काँग्रेसच्या नेत्यांची होती. मात्र तसे घडले नाही. गेल्या आठवड्यात प्रियांका गांधी यांच्या उत्तर प्रदेश भेटीदरम्यान त्या नवीन प्रदेशाध्यक्ष घोषित करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी फक्त कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आणि कार्यकर्त्यांना परिश्रम करण्याचा सल्ला दिला. प्रियांका गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने संगितले की “ज्यावेळी इतर पक्ष हे आगामी महानगर पालिका आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत तेव्हा आमच्या पक्षात प्रदेशाध्यक्षाची नेमणुकच करण्यात आलेली नाही. उत्तर प्रदेशात पक्षाच्या सक्षमीकरणाच्या प्रयत्नात आम्ही शर्यतीय मागे पडू शकतो”. 

Shobha Bachhav, BJP Dhule,
धुळ्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत ? शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
sangli Mahavikas Aghadi
मविआची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर होताच कॉंग्रेस संतप्त, बैठकीत पुढील निर्णय – आमदार सावंत
hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका
giving tickets to ministers children relatives not dynastic politics siddaramaiah
काँग्रेसच्या उमेदवार याद्यांवर घराणेशाहीचे आरोप? सिद्धरामय्या म्हणतात, “मतदारांचा कल, कार्यकर्ते-नेत्यांच्या शिफारशी…!”

पक्षाच्या एका जेष्ठ नेत्याने सांगितले की, ” उत्तर प्रदेश अध्यक्षाची निवड करण्यास अनेक कारणांमुळे उशीर होत आहे. जात आणि संभाव्य अध्यक्षांचे वय हे यातील प्रमुख मुद्दे आहेत. युपी अध्यक्ष पद हे एकाच व्यक्तीकडे सोपवयाचे की ही जबादारी ४ लोकांवर विभागून देण्यात यावी याबाबत चर्चा सुरू आहे. राज्यात पक्षाची धुरा तरुण नेतृत्वाकडे देण्यात यावी अशी बऱ्याच नेत्यांची इच्छा आहे. उत्तर प्रदेशात पक्षाची पुनर्बांधणी करणे हे खूप कठीण काम आहे. अर्थात याबाबतचा निर्णय हा प्रियांका गांधी यांना घ्यायचा आहे. 

उत्तर प्रदेशचे नेतृत्व एखाद्या नेत्याला देण्याबाबत पक्ष अनेक पैलूंवर विचार करत आहे. असे प्रियांका गांधी यांच्या लखनऊ येथे नुकत्याच झालेल्या पक्ष संमेलनात उपस्थित राहिलेल्या एका नेत्याने संगितले. अजूनही राज्यातील पक्षाचे नेतृत्व निवडण्यास उशीर होत असल्यामुळे पक्षाच्या काही नेत्यांमध्ये नाराजी आहे. पक्षाचे दिल्लीतील नेतृत्व यूपीमधील नेत्यांची चिंता आणि तक्रार ऐकून घेत नसल्याचा सूर ऐकायला मिळत आहे.