90 MLAs from Rajasthan Congress resign to support Gehalot pkd 83 | Loksatta

राजस्थान कॉंग्रेसमधील अस्थिरता वाढली, सचिन पायलट यांना विरोध असणाऱ्या आमदारांचे राजीनामे

आमदारांनी रविवारी उशिरा राजस्थान विधानसभा अध्यक्ष सी पी जोशी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केले आहेत.

राजस्थान कॉंग्रेसमधील अस्थिरता वाढली, सचिन पायलट यांना विरोध असणाऱ्या आमदारांचे राजीनामे

राजस्थानमधील सत्तासंघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. गेहलोत त्यांच्याशी सल्लामसलत न करता मुख्यमंत्रिपदाची निवड करण्याच्या काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाला विरोध करत अशोक गेहलोत यांच्याशी निष्ठावान असणाऱ्या ९० आमदारांनी रविवारी उशिरा राजस्थान विधानसभा अध्यक्ष सी पी जोशी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केले आहेत. अशोक गेहलोत लवकरच पक्षाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी अपेक्षा आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सचिन पायलटकडे सोपविण्याचा काँग्रेस हायकमांडचा कल स्पष्ट होताच, गेहलोत यांच्या निष्ठावंत आमदारांनी रविवारी दुपारपासून आपला विरोध नोंदवण्यासाठी गोंधळ घालण्यास सुरवात केली. आमदारांनी कॅबिनेट मंत्री शांती धारीवाल यांच्या हॉस्पिटल रोड येथील निवासस्थानात प्रवेश करण्यास सुरुवात केली जिथे त्यांनी विधानसभा अध्यक्ष सी पी जोशी यांच्याकडे राजीनामा देण्यास सहमती दर्शवली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) बैठकीला जाण्याऐवजी पायलट यांच्या नावाला विरोध दर्शवला.

दुपारी, जैसलमेरमधील तनोत माता मंदिराच्या भेटीदरम्यान, गेहलोत पत्रकारांना म्हणाले की “आमची परंपरा आहे की जेव्हा जेव्हा सीएलपी निवडणुकीच्या वेळी किंवा मुख्यमंत्रिपदाच्या निवडीसाठी भेटते तेव्हा एक ओळीचा प्रस्ताव मंजूर केला जातो. काँग्रेस अध्यक्षांना (निर्णय घेण्याचा) अधिकार देत आहेत. मला विश्वास आहे की आजही हीच परंपरा पाळली जाईल.”

हायकमांडला निर्णय घेण्याचा अधिकार देण्याचा निर्णय म्हणजे पायलटसोबत जाण्याच्या संभाव्य निर्णयाला सहमती देणे  असा अर्थ होतो जे गेहलोत निष्ठावंतांना मान्य नाही. जे पायलट यांच्या बंडखोरीकडे लक्ष वेधतात आणि पायलट यांनी पदभार स्वीकारल्यास सरकारमधील त्यांच्या स्थानाबद्दल असुरक्षित देखील आहेत.  गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपदी कायम राहावे अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यांच्या छावणीतील कोणीतरी मुख्यमंत्री व्हावे यासाठी पुढील सर्वोत्तम परिस्थिती आहे. 

धारिवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर, अपक्ष आमदार आणि गेहलोत यांचे सल्लागार संयम लोढा म्हणाले, “पुढील मुख्यमंत्री २०२० च्या राजकीय संकटाच्या वेळी फेअरमॉन्ट हॉटेल (जयपूरमधील) आणि सूर्यगढ (जैसलमेरमधील रिसॉर्ट) मध्ये असलेल्या आमच्या १०२ पैकी असावा. . गद्दारी  आणि सरकार पाडण्याचा भाजपासोबत कट रचणाऱ्यांपैकी कोणीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही, हा आमचा सर्वानुमते निर्णय आहे”.

सी पी जोशी यांना उद्देशून लिहिलेल्या छोट्या, एक पानाच्या राजीनामा पत्रात असे लिहिले आहे की आमदार स्वेच्छेने विधानसभेचा राजीनामा देत आहेत आणि राजीनामा विलंब न करता स्वीकारण्यात यावा. तर राजीनाम्याची पत्रे नियमानुसार योग्य स्वरूपात नसल्याचा दावा विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांनी केला आहे. 

कॅबिनेट मंत्री प्रताप सिंह खाचरियावास म्हणाले की, सर्व आमदार “खूप संतप्त” आहेत. “आमची मागणी आहे की सोनिया जी आणि राहुल जी आमचे नेते आहेत, त्यांनी आमची दिल की बात ऐकावी आणि समजून घ्यावी,” ते म्हणाले. हायकमांडने आमचे म्हणणे ऐकून निर्णय घ्यावा, हा आमदारांचा एकमताने निर्णय आहे”. १७ तारखेनंतर पक्षाध्यक्ष निवडणूक संपल्यानंतर तुम्ही बैठक बोलावू शकले असते. मुख्यमंत्री म्हणतात की ते आमचे पालक आहेत, मग ते आमदारांना महत्त्व देणार नाहीत का?”

हायकमांडच्या निर्णयाविरुद्ध बंडखोरी पूर्वनियोजित नव्हती, असे सांगून खाचरीवास म्हणाले की, “मी धारिवाल जींना (सीएलपीसाठी) घ्यायला गेलो होतो, पण ते म्हणाले की आमदार त्यांना जाऊ देत नाहीत. मी पोहोचलो तोपर्यंत जवळपास ९० आमदार जमले होते. लोकशाही ही संख्याबळावर आधारित आहे. राजस्थानचे आमदार ज्यांच्यासोबत असतील तो नेता असेल. १०० हून अधिक आमदार एका बाजूला आणि सुमारे १०-१५ आमदार दुसरीकडे आहेत” असे ते म्हणाले. जोशी यांना राजीनामा पत्र सुपूर्द केल्यानंतर आमदार बाबूलाल नागर म्हणाले की, “सर्व आमदारांचे एकमत आहे की अशोक गेहलोत यांनी आधी मुख्यमंत्री व्हावे, त्यानंतर आमदारांचा सल्ला घ्यावा, त्यानंतर हायकमांडचा निर्णय आम्हाला मान्य असेल.”

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-09-2022 at 15:39 IST
Next Story
राहुल गांधी यांचा गंभीर आरोप, अटलबिहारी वाजपेयींसह भाजपा भारतात इंग्रजीवर बंदी…