मागच्या काही निवडणुकांमध्ये पंजाबमध्ये भाजपाला फारसे यश मिळू शकलेले नाही. मात्र आता पंजाबमध्ये आपला ठसा उमटविण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली लवकरच राज्यव्यापी व्यसनमुक्ती यात्रा काढली जाणार आहे. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या दौऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. अमृतपाल सिंह यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे पंजाबमध्ये पुन्हा एकदा कट्टरपंथी वातावरण निर्माण होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आपला राष्ट्रवादाचा विचार आणखी जोरकसपणे मांडण्याची शक्यता आहे.

निवडणुकांच्या निकालानुसार भाजपाला पंजाबमध्ये आतापर्यंत फारसे काही करता आलेले नाही. मागच्या विधानसभा निवडणुकीत आपने मिळवलेले यश भाजपाच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरले. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने पंजाबवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पुढच्या महिन्यात अमित शहा व्यसनमुक्ती यात्रा सुरु करतील. त्यानंतर पक्षाध्यक्ष जेपी नड्डा देखील विविध कार्यक्रमांची सुरुवात करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याही दौऱ्याची आखणी केली जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबच्या जनतेला सुशासन, राष्ट्रवाद आणि निर्णयक्षम नेतृत्वाचा संदेश देण्यासाठी भाजपाकडे ही योग्य वेळ आहे.

Narendra Modi, Kanhan, Nagpur,
‘बेरोजगारी, महागाईबाबत मोदी अपयशी, मात्र राम मंदिर…’, कन्हान येथे पंतप्रधानांच्या सभेला आलेल्या नागरिकांचे मत
Raj thackeray, Mahayuti, MNS,
मनसेच्या पाठिंब्याने महायुतीचा फायदा किती ?
Why Are the Rajput community angry at the statement of Union Minister Rupala
गुजरातमध्ये भाजपच्याच नेत्यामुळे भाजप अडचणीत? केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या विधानावर रजपूत समाज संतप्त का?
Case of denial of soldiers allowance to family members No decision on martyrs wifes demand due to Lok Sabha elections
कुटुंबीयांना सैनिक भत्ता नाकारण्याचे प्रकरण : लोकसभा निवडणुकांमुळे शहीद पत्नीच्या मागणीवर निर्णय नाही

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचा सहयोगी पक्ष असलेल्या अकाली दलाने कृषी विषयक तीन कायद्याचा मुद्दा पुढे करुन भाजपाशी काडीमोड घेतला होता. त्यानंतर होणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा पंजाबमध्ये लोकसभा स्वबळावर लढणार आहे. २०१९ साली अकाली दलाच्या विरोधात पंजाबमधील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात रोष होता. याचा फटका युतीमध्ये निवडणूक लढणाऱ्या भाजपालाही बसला. अकाली दलाच्या युतीत भाजपाच्या गुरुदासपूर आणि होशियारपूर या दोनच जागा निवडून आल्या. तसेच राज्यातील एकूण मतदानाची टक्केवारी होती ९.६३ टक्के एवढीच.

अकाली दलाशी युती तुटल्यानंतर भाजपाने पंजाबमधील छोट्या छोट्या पक्षांशी युती करण्याचा निर्णय घेतला. त्याचाच एक भाग म्हणून पंजाबचे माजी मुख्यंमत्री अमरिंदर सिंह यांच्या पंजाब लोक काँग्रेससोबत युती करण्यात आला. कालांतराने अमरिंदर सिंह यांनी हा पक्षच भाजपात विलीन केला. मात्र या युतीचा २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत फारसा फायदा होऊ शकला नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने अकाली दलासोबत मिळून २३ जागा लढविल्या होत्या, त्यापैकी फक्त तीन जाग जिंकल्या. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ७३ जागा लढविल्या आणि दोनच जागी विजय मिळाला.

वर्षानुवर्ष पंजाबमध्ये भाजपाची कामगिरी यथातथाच राहिलेली आहे. तरीही यावेळी भाजपाने पंजाबवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. २०२२ च्या निवडणुकीदरम्यान भाजपाने ‘आप’ पक्ष पंजाबसाठी धोक्याची घंटा असल्याचे म्हटले होते. आपचे सर्वेसर्वा हे दहशतवादी संघटनांसोबत तोडजोड करतात तसेच केजरीवाल यांच्या अशा संघटनांसोबत बैठका झाल्याचाही आरोप भाजपाने केला होता. जेपी नड्डा यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले होते की, “आम्ही ६०० किमी सीमेच्या दृष्टीने पंजाबकडे पाहतो. हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे.”

भाजपाचे खासदार परवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांना दहशतवादी म्हणून संबोधले होते. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना वर्मा म्हणाले की, आपच्या बाबतीत आम्ही वर्तवलेली भीती खरी ठरली आहे. संवेदनशील राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हे लोक कशी हाताळतील, याबाबत आम्हाला साशंकता वाटत होती. आता बघा पंजाबमध्ये किती गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे. तसेच एक जबाबदार राष्ट्रीय पक्ष या नात्याने आम्हाला या गोष्टींचा गुंता आणखी वाढवू द्यायचा नाही. याची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य समजतो.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अमली पदार्थ विरोधी यंत्रणांच्या माध्यमातून राज्यातील अमलीपदार्थांविरोधात कारवाई करत आहेत, तर दुसऱ्याबाजूला राज्यातंर्गत आणि राज्याबाहेरील धोक्यांकडेही लक्ष ठेवून आहेत. शहा करत असलेली कारवाई ही भाजपाच्या केडरला योग्य संदेश असल्याचे भाजपामधील लोकांना वाटते. पंजाबमधील लोक अमली पदार्थ्यांच्या विळख्यामुळे आधीच अस्वस्थ होते, त्यात आप पक्ष अपयशी ठरल्यामुळे आणखी नाउमेद झाले. सध्या घडत असलेल्या घडामोडी जनतेच्या मनात गोंधळ निर्माण करत आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपामधील नेत्याने दिली.

पंजाबमध्ये अमृतपाल सिंहच्या वाढत्या प्रभावाबाबत आपने केंद्राला कळविले होते, मात्र केंद्र सरकारने जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप आपने केला आहे. तसेच भाजपाची ही एक राजकीय खेळी असल्याचे आपचे नेते म्हणत आहेत. भाजपाच्या नेत्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले.