चंद्रशेखर बोबडे

नागपूर: नागपूर शिक्षक मतदारसंघात प्रथम निवडणूक लढवणाऱ्या आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पक्षाला एक हजार मतांचा टप्पाही गाठता आला नाही. बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला तर मतांचे शतकही गाठता आले नाही हे येथे उल्लेखनीय. एकूण २२ उमेदवारांपैकी अडबाले वगळात त्यांचे दोन निकटतम प्रतिस्पर्धी भाजप समर्थिक नागोराव गाणार यांना ८२११ आणि शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांना ३३५८ मते मिळाली. हे तीन उमेदवार वगळता एकाही उमेदवाराला चार अंकी मते घेता आली नाहीत. या निवडणुकीत आम आदमी पार्टी, बहुजन विकास आघाडी आणि बहुजन समाज पार्टीने प्रथमच उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र शिक्षक संघटनांचे पाठबळ नसल्याने यांना प्रभावी कामगिरी करता आली नाही. या पक्षाच्या उमेदवारांच्या मतांची संख्या तीन आकड्यांपर्यंतच मर्यादित राहिली यात बसपाच्या उमेदवारांची मतसंख्या ही दोन आकडी आहे.

Pimpri, Traders camp, Mahayuti,
पिंपरी : कॅम्पातील व्यापाऱ्यांचा महायुतीला पाठिंबा; महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरेंना धक्का
Loksatta anvyarth Aam Aadmi Party Delhi Chief Minister Arvind Kejriwal arrested by ED in liquor scam
अन्वयार्थ: आता राजकीय ‘आप’-घात?
Leaders of India will have a power show tomorrow and organize a meeting at Ramlila ground in Delhi
‘इंडिया’च्या नेत्यांचे उद्या शक्तिप्रदर्शन, दिल्लीत रामलीला मैदानावर सभेचे आयोजन; विरोधकांच्या एकजुटीला बळ
ED and CBI have been the operatives of Narendra Modi in the country for the last 10 years says nana patole
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ईडी व सीबीआय हे कार्यकर्ते; नाना पटोले म्हणतात, “त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये…”

हेही वाचा… तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची उद्या राज्यात पहिली सभा, जोरदार वातावरणनिर्मिती

पूर्व विदर्भातील एकूण सहा जिल्ह्यांमिळून झालेल्या मतदान झालेल्या एकूण ३४ हजार ३६० मतांपैकी आम आदमी पार्टीचे देवेंद्र वानखडे यांना ८६३, वंचित बहुजन आघाडीचे प्रा.दीपकुमार खोब्रागडे ३७३ आणि बहुजन समाज पार्टीच्या निमा रंगारी यांना फक्त ६६ मते मिळाली. रिंगणात असलेले इतर पक्ष व अपक्ष १७ उमेदवारांपैकी सतीश जगताप (महाराष्ट्र विकास आघाडी पक्ष )यांना ५१४ मते मिळाली. खुप गाजावाजा झालेले राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार सतीश इटकेलवार फक्त ८९ मते घेऊ शकले. सर्वात कमी ९ मते श्रीधर साळवे यांनी घेतली. रामराव चव्हाण (अपक्ष )यांचा असून त्यांना १२ मते तर नरेश पिल्ले (विश्व हिंदू जनसत्ता बहुमत पक्ष) यांना १४ मते मिळाली.

हेही वाचा… शिवसेनेचे आमदार वैभ‌‌‌‌व नाईक आणि राजन साळवींच्या सरकार हात धुवून मागे लागले

राज्याच्या राजकारणात वंचित व बहुजन समाज पार्टी हे दोन महत्वाचे राजकीय पक्ष आहेत. या पक्षाच्या उमेदवारी अनेकदा भाजपला फायदेशीर ठरणारी असते. या निवडणुकीत मात्र या पक्षाच्या उमेदवारांची पक्षाच्या मतदारांनी दखल घेतलेली दिसत नाही. निवडणूक अंतिम टप्प्यात असताना महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेनेने वंचितशी युती केली होती. त्यापूर्वी शिवसेनेने महाविआच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. मात्र वंचितचाही उमेदवार रिंगणात होता. त्यामुळे सेनेची नेमकी भूमिका काय असाही प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र मविआच्या विजयाने हे सर्व प्रश्न निरर्थक ठरले.