महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या राजकारणात परिणामकारक हस्तक्षेप करणाऱ्या नव्हे तर काही मतदारसंघांतील निकाल बदलण्याची क्षमता असलेल्या वंचित बहुजन आघाडीची आगामी लोकसभा निवडणुकीत नेमकी काय भूमिका असेल हा, प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. दुसरा प्रश्न असा की, वंचित आघाडी देशात इंडिया किंवा महाराष्ट्रात महाविकास आघाडी या विरोधी पक्षांच्या आघाडीत सहभागी होणार की, पुन्हा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील भूमिकेची पुनरावृत्ती करणार हे सारेच गुलदस्त्यात आहे.

पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळायला थोडा कालावधी जावा लागेल. परंतु दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर थेट देता येत नसले तरी, २०१९ च्या निवडणुकीत जी सुरुवात झाली होती, आताही तशीच झाली आहे. मागील निवडणुकीतील युती आघाड्यांची समीकरणे वेगळी होती, आता निराळी आहेत. म्हणजे त्यावेळी भाजप-शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी असा थेट सामना होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची झालेली वाताहत धक्कादायक आणि शोचनीय होती. त्यामुळेच गेल्या निवडणुकीत काँग्रेसने ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नव्याने उभ्या राहिलेल्या वंचित बहुजन आघाडीशी हातमिळवणी करण्याची तयारी दर्शविली होती. अर्थात तशीच भूमिका वंचित आघाडीनेही घेतली होती.

Mahayuti, Shinde group leader,
महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता, शिंदे गटाच्या नेत्याचे भाकित
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
hindenburg questions sebi chief madhabi buch s silence amid congress claims
सेबी अध्यक्षांवर नव्याने आरोप;प्रतिसादशून्य मौनावरही ‘हिंडेनबर्ग’कडून प्रश्न
Uddhav Thackeray, Sangli meeting, Shivsena,
सांगलीच्या मेळाव्याकडे उद्धव ठाकरे यांची पाठ, शिवसेना जाणीवपूर्वक दूर
Vasai, BJP leader, vadhavan port, fishermen,
वसई : वाढवण बंदराच्या विरोधात भाजप नेत्याच्या दुटप्पी भूमिकेमुळे मच्छीमारांमध्ये संभ्रम
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
vijay wadettiwar on deepak kesarkar
Vijay Wadettiwar : “शिवरायांचा पुतळा अपघाताने कोसळला” म्हणणाऱ्या दीपक केसरकरांवर विजय वडेट्टीवारांचं टीकास्र; म्हणाले, “अपघाताने आलेल्या सरकारचं…”
Opposition of Mahavikas Aghadi to development works in Naina area
नैना क्षेत्रातील विकसकामांना महाविकास आघाडीचा विरोध

हेही वाचा : ‘कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही’, ‘आप’च्या संजय सिंह यांच्या अटकेनंतर काँग्रेसची भूमिका

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते व प्रकाश आंबेडकर यांच्यात अनेक बैठकांची सत्रे पार पडली. वैचारिक भूमिकेवर चर्चा झाली. परंतु जागावाटपात गाडे अडले. अखेर वंचित आघाडीबरोबर समझोता होऊ शकला नाही, वंचितने लोकसभेच्या सर्व जागा लढवल्या, त्याचा राजकीय ताकद आजमवण्यात वंचित आघाडीला फायदा झाला, परंतु काँग्रेस व राष्ट्रवादीला त्याचा मोठा फटका बसला. वंचित आघाडीची एमआयएमबरोबर युती होती, तरी दलित समाजाबरोबरच बहुजन समाजातील सत्ता वंचित घटकही प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच ताकदीने एकवटलेला होता. निवडणूक निकालात त्याचे प्रतिबिंब दिसले. वंचित आघाडीच्या खात्यावर सुमारे ५० लाख मते जमा झाली. राज्यातील जवळपास ८० टक्के मतदारसंघात वंचितचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. साहजिकच त्याचा फटका काँग्रेस व राष्ट्रवादीला बसला.

हेही वाचा : ईडीचा कचाट्यात तृणमूल काँग्रेसचा आणखी एक मंत्री; ममता बॅनर्जींच्या विश्वासू नेत्यावर कारवाई

गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीचा थेट १० मतदारसंघांवर परिणाम झाला होता. प्रकाश आंबेडकर स्वतः अकोला व सोलापूरमधून पराभूत झाले, शिवाय सोलापूरमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनाही पराभव पत्करावा लागला. अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर, सांगली या मतदारसंघात मतविभाजनाचा फायदा भाजप-शिवसेनाला झाला, काँग्रेस उमेदवार पराभूत झाले. बुलढाणा व परभणीमध्ये राष्ट्रवादीला फटका बसला. चंद्रपूरमध्ये मात्र वंचितमुळे भाजपचा पराभव झाला. औरंगाबादमध्ये वंचित-एमआयएम युतीचा उमेदवार निवडून आला. तिथे शिवसेनेच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत वंचितचा सहभाग असता तर महाराष्ट्रातील राजकीय चित्र वेगळे दिसले असते.

हेही वाचा : डॉ. विजयकुमार गावित यांना पक्षांतर्गत वाद आणि शिंदे गटाची नाराजी भोवली

आता देशात इंडिया नावाने पुन्हा विरोधकांची आघाडी उभी राहिली आहे. केंद्रातील सत्तेतून भाजपला हद्दपार करणे, हा एक कलमी कार्यक्रम इंडिया आघाडीचा आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना केंदातील भाजपची सत्ता जाचक ठरली आहे, ते पक्ष आपापसातील मतभेद विसरुन एकत्र आले आहेत. महाराष्ट्रात आधीपासूनच काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांची आघाडी आहे. त्यात काही लहान पक्षही सहभागी आहेत. मात्र या वेळची राजकीय समीकरणे वेगळी आहेत. शिवेसनेत व राष्ट्रवादीत फूट पडली आहे. दोन्ही पक्षातील मूळ गट व काँग्रेस यांची आघाडी आहे, तर दोन्ही पक्षातील फुटीर गट हे भाजपसोबत आहेत. इंडिया आघाडीच्या बांधणीची लगबग, धावपळ सुरु असतानाच, प्रकाश आंबेडकर यांनी त्या आघाडीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.

हेही वाचा : कल्याण – डोंबिवलीकडे ठाकरेंची पाठ

मुंबईत झालेल्या इंडियाच्या बैठकीदरम्यान वंचितच्या वतीने तसे पत्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिले. काँग्रेसचे नेते वंचित आघाडीला सोबत घेणार असल्याची वक्तव्य करीत आहेत. मात्र त्याबाबत अधिकृतपणे कुणीही अजून भाष्य केलेले नाही, असे आंबेडकर यांचे म्हणणे आहे. दुसरे असे की, प्रकाश आंबेडकर व उद्धव ठाकरे यांनी वंचित-शिवसेनेची युती आधीच जाहीर केली आहे. मात्र एकत्रित महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीकडून वंचितसोबत युतीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. होणार की नाही हेही अजून स्पष्ट नाही. यात काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. परंतु भाजपला उघडपणे समर्थन देणारे शरद पवार व अजित पवार यांच्याबाबत काँग्रेसची जी भूमिका असते, ती स्वाभिमानाने लढणाऱ्या प्रकाश आंबेडकरांबाबत नसते.

परंतु आंबेडकर आघाडीच्या बाहेर राहिले तर काय परिणाम होतील, याची जाणीवही काँग्रेसला आहे. परंतु दोन्ही बाजुने सध्या अशी परिस्थिती आहे की, वंचित आघाडीला बरोबर घ्यायचे आहे, पण घ्यायचे नाही, असा काँग्रेसचा गोंधळ आहे आणि आघाडीत यायचे आहे, पण यायचे नाही, अशी वंचितची अवस्था आहे. आता काँग्रेसकडून काहीच अधिकृतपणे चर्चा होत नसल्याने प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व ४८ जागा लढवेल, असे जाहीर केले आहे. पुढे काय होणार, त्याची वाट बघावी लागेल.