गुजरातमध्ये सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना गुजरात एटीएसने अटक केली. तीस्ता सेटलवाड यांच्या अटकेमुळे पुन्हा एकदा गुजरात दंगलीचा विषय चर्चेत आला आहे आणि त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.गुजरात दंगली प्रकरणी झाकिया जाफरी यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि अन्य ६२ जणांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. .सर्वोच्च न्यालयाने या प्रकरणात क्लीन चीट दिली आहे.

१२ सप्टेंबर २०११ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका कुठलेही निर्देश न देता अहमदाबाद येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात परत पाठवली होती. तेव्हा नरेंद्र मोदी यांनी ‘गॉड इज ग्रेट’ असे ट्विट केले होते. या घडामोडींच्या काही दिवसांनंतर मोदी यांनी त्यांच्या ६२व्या वाढदिवसाच्या दिवशी गुजरातमध्ये विविध जिल्ह्यांतील सर्व धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन सद्भावना’ उपोषण सुरू केले होते. पंतप्रधान या नात्याने मोदींनी याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया देणे टाळले. या निकालात गुजरात प्रशासनाला क्लीनचीट देण्यात आली होती. सध्या भाजपा मात्र विजय साजरा करण्याच्या तयारीत आहे. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या मोदींविरोधात याचिका, कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड, निवृत्त डीजीपी आर.बी श्रीकुमार, माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट आणि इतरांनी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करत भाजपाने आणि त्यांच्या पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांनी निकालाचे स्वागत केले आहे. गुजरात भाजपा प्रमुख सी.आर पाटील यांनी सेटलवाड यांना “काँग्रेसची कठपुतली” म्हटले आणि मोदींना अडकवण्यासाठी पुराव तयार केल्याचा आरोप तिघांवर केला.

निर्णयाच्या एका दिवसानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एएनआयला एक मुलाखत दिली होती. ही मुलाखत पूर्णपणे गुजरात दंगलीवर आधारित होती. माध्यमे, राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांच्या त्रिकुटाविरुद्ध आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. गुजरात दंगलीबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशाला मतदानाचा मुद्दा बनवणार नाही अशी भूमिका भाजपाने घेतली होती. भाजपाने ही भूमिका जाहीरपणे घेतली असली तरी पक्ष तो ‘नैतिक विजय’ म्हणून साजरा करणार आहे. २००२ च्या दंगलीतील काही आरोपींचा भाजपाशी थेट संबंध असण्याविषयी एका वकिलाने सांगितले की “एक वकील म्हणून मला माहित होते की साक्षीदारांना कसे शिकवले जात होते. अनेक निरपराध लोकांना फसवले गेले आणि त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. या निकालामुळे मोदीजींना फसवणाऱ्यांविरोधात न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होईल”.वकिलाने नाव न सांगण्याचा अटीवर पुढे सांगीतले की, “न्यायालयाचा आदेश तसेच सेटलवाड आणि श्रीकुमार यांच्या अटकेमुळे दंगलीच्या प्रकरणांमध्ये खोटे आरोप करणाऱ्या पक्ष समर्थकांना देखील संदेश जाईल”.