after enter in rajasthan congress bharat jodo yatra can stop gehalot pilot dispute spb 94 | Loksatta

काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा राजस्थानमध्ये दाखल, गेहलोत-पायलट वाद मिटणार? राहुल गांधीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

राहुल गांधींची यात्रा राजस्थानमध्ये दाखल झाल्यानंतर तरी किमान गेहलोत आणि पायलट यांच्यातील वाद मिटणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा राजस्थानमध्ये दाखल, गेहलोत-पायलट वाद मिटणार? राहुल गांधीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
फोटो सौजन्य – द इंडियन एक्सप्रेस

राजस्थानमध्ये सध्या सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यात वाद सुरू आहे. अशातच आता राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा मध्यप्रदेशमधून राजस्थानमध्ये दाखल झाली आहे. जलवार जिल्ह्यातील चावली येथे या यात्रेचं मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले आहे. दरम्यान, राहुल गांधींची यात्रा राजस्थानमध्ये दाखल झाल्यानंतर तरी किमान गेहलोत आणि पायलट यांच्यातील वाद मिटणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा: उपमुख्यमंत्र्यांनी चालवलेल्या वाहनाच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या वादानंतर झटपट नूतनीकरण

गेहलोत-पायलट समर्थक पुन्हा आमने-सामने

रविवारी संध्याकाळी भारत जोडो यात्रा, राजस्थानमध्ये दाखल झाली. या यात्रेच्या मार्गावर मोठ्या प्रमाणार स्वागताचे होर्डिंग्स् लावण्यात आले होते. मात्र, यावरून पुन्हा एकदा गेहलोत आणि पायलट यांचे समर्थक आमनेसामने आल्याचे बघायला मिळालं. शनिवारी, सचिन पायलट यांच्या समर्थकांनीही याठिकाणी काही होर्डिंग लावले होते. मात्र, जिल्हा प्रशानाकडून हे होर्डिंग्स् काढण्यात आले. हे होर्डिंग्स् महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या दबावामुळे काढण्यात आल्याचा आरोप पायलट समर्थकांनी केला. मात्र, हे होर्डिंग्स् अनधिकृत असल्याने काढल्याचे स्पष्टीकरण जलवार मनपा आयुक्त रुही तरनम यांनी दिले.

हेही वाचा – Gujarat Election 2022 : गुजरातच्या जुहापुरातील मुस्लीम समुदाय अद्यापही शिक्षणापासून वंचित

काँग्रेस श्रेष्ठींकडून वाद मिटवण्याचा प्रयत्न

यापूर्वी काँग्रेस नेते आणि राजस्थानचे प्रभारी के.सी. वेणुगोपाल यांनीही गेहलोत-पायलट यांच्याशी बंद दाराआड चर्चा करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्यांनी दोघांच्याही समर्थकांना शांत राहण्याच्या सुचना केल्या होत्या. याचबरोबर राजस्थान सरकारमधील मंत्र्यांनाही या प्रकरणावर न बोलण्याच्या सुचना देत कोणी या निर्देशांचे उल्लंघन केल्यास त्यांना मंत्रीपदावरून हटवण्यात येईल, असा इशा त्यांनी दिला होता.

हेही वाचा – MCD Election : मतदान यादीतून अनेक नावं गायब…;  ‘आप’ करणार निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार!

‘भारत जोडो’ यात्रा यशस्वी करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

दरम्यान, भारत जोडो यात्रा, २१ डिसेंबरपर्यंत राजस्थानमध्ये आहे. यादरम्यान ९ आणि १७ डिसेंबर असे दोन दिवस ही यात्रा स्थगीत करण्यात येईल. महत्त्वाचे म्हणजे, भारत जोडो यात्रा या ज्या मार्गावरून जाणार आहे. त्यापैकी काँग्रेसची सत्ता असलेलं राजस्थान हे शेवटचं राज्य आहे. त्यामुळे ही यात्रा यशस्वी करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 21:13 IST
Next Story
मतदान सुरू असताना पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांकडून भाजपाचा प्रचार, काँग्रेस ECकडे करणार तक्रार