महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थितीत बघता महाविकास आघाडीचे सरकार टीकून रहाण्याची शक्यता दिसत नाहीये. शिवसेनेत झालेले बंड आणि पडद्यामागे भाजपाची रणनिती बघता आता काँग्रेसना त्यांच्याच आमदारांची चिंता वाटू लागली आहे. काँग्रेसमधील एका गटाच्या म्हणण्यानुसार काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व काँग्रेसला एकत्रित ठेण्यासाठी हालचाल करत नाहीये आणि पक्षातील काही आमदार हे सहज भाजपाच्या रणनितीचे लक्ष्य ठरु शकतात. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर बुधवारी रात्री काँग्रसने निरिक्षक म्हणून कमलनाथ यांना परिस्थितीचा आढाव घेण्यासाठी पाठवले होते. काँग्रेस पक्षाच्या ४४ आमदारांशी संवाद साधत परिस्थितीचा अंदाज घेण्यात आला. महाराष्ट्राती महाविकास आघाडी आता राहत नसल्याच्या निष्कर्षापर्यंत काँग्रेस नेतृत्व आले आहे.

कमलनाथ यांनी महाराष्ट्रात आल्यावर राज्यातील परिस्थितीबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवादही साधला. त्यानंतर महाराष्ट्रातून निघण्यापूर्वी राज्यातील परिस्थितीबाबत काँग्रेस नेतृत्वाला अवगत केले.

“आता ही परिस्थिती गेल्यात जमा आहे. लढण्याची इच्छाशक्ती उद्धव ठाकरे यांनी गमावली आहे. कदाचित प्रकृती समस्या हे कारण असावे. असे असले तरी आपण काही करु शकत नाही. हेच राष्ट्रवादी काँग्रेसबाबत आहे. आता सत्ता वाचवणे हे फक्त शिवसेनेच्याच हातात आहे”, अशी प्रतिक्रिया काँग्रेसमधील एका नेत्याने इंडियन एक्सप्रेसला दिली आहे.

कमलनाथ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले “आमचे आमदार हे आमच्याबरोबर आहेत. काँग्रेसमध्ये पूर्णपणे एकजूट आहे. माझा प्रश्न हा आहे की शिवसेनेचे आमदार हे अजुनही गुवाहाटी इथे का आहेत ? नव्या नेतृत्वासाठी उद्धव हे राजीनामा देण्यास तयार आहेत. तर त्यांनी परत येऊन पक्षाच्या विधीमंडळ सदस्यांची बैठक बोलवावी आणि हवा तो नेता निवडावा. गुवाहाटी राहून त्यांना काय साध्य करायचे आहे ?”.

“काँग्रेसचे प्रदेश प्रभारी एच के पाटील यांनी सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस आमदारांबाबत कोणताही पुढाकार घेतलेला नाही. सर्व आमदारांना एकत्रित ठेवणे आवश्यक असतांना अनेकजण मुक्तपणे फिरत आहेत. विधानपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस आमदारांची मते फुटली होती हे विसरता कामा नये” अशी प्रतिक्रिया इंडियन एक्सप्रेसला राज्यातील एका काँग्रेस नेत्याने दिली आहे.

“दोन ते सात आमदारांची मते ही फुटली होती. पक्षाने ठरवलेल्या पहिला उमेदवार, पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला. पक्षाने हे खरंच गंभीरपणे घेतलं आहे का ? दुसऱ्याला मत देणारे आमदार कोण आहेत ? पक्षाने याचा शोध घेतला का ? ” असा प्रश्न काँग्रेसच्या एका नेत्याने उपस्थित केला. चंद्रकांत हांडोरे यांना पहिल्या पंसदीची २९ मते ही निश्चित केली होती, पण त्यांना प्रत्यक्षात २२ मिळाली. दोन शक्यता आहेत. हांडोर यांना मतदान करणाऱ्या पाच आमदारांपैकी काहींनी भाई जगताप यांना मत दिले. जर असे असेल तर दोन जणांनी भाजपाला मतदान केले. पण वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार भाई जगताप यांनी जादाची पाच मते ही अपक्षांकडून मिळवली. मग याचा अर्थ पक्षाची सात मते ही भाजपाला गेली. या सर्व चिंतेच्या गोष्टी नाहीत का ? पण हे गंभीरपणे घेण्यात आलेले नाही.याचा अर्थ आमचे आमदार हे सहज जाळ्यात अडकू शकतात.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना हांडोरे म्हणाले ” मी माझे गणित केले आणि त्यानुसार मला अपेक्षित असलेली दोन मते फुटली आणि पाच जणांनी जगताप यांना मतदान केले”

“कमलनाथ आले आणि आढाव घेऊन दोन दिवसात निघून गेले. यात त्यांची चूक नाही. कारण त्यांनाही त्यांच्या राज्यात पक्ष सांभाळायचा आहे. पण एच के पाटील हे मुंबईत असल्याचे सांगितले जात होते. पण पक्षाचे आमदार त्यांना भेटू शकत होते का, परिस्थिती अशी हाताळली जाते का ? ज्यांच्याकडे राज्यातील पक्षाची जबाबदारी आहे त्यांना मुख्यमंत्री भेटले नाहीत. पण पवारांना भेटले. हे नक्की दर्शवते ?” अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने दिली आहे.

Story img Loader