छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये २४ ते २६ फेब्रुवारी या काळात काँग्रेसचे ८५ वे महाअधिवेशन होणार आहे. या अधिवेशनातच पक्षाचे सर्वोच्च धोरण ठरवणाऱ्या काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या निवडीचाही मार्ग मोकळा होणार आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवडीला मंजुरी देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या या अधिवेशनात निवडणुकीद्वारे नवीन कार्यकारिणी स्थापन करायची की काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना सर्वानुमते नामनिर्देशित करण्याचे अधिकार दिले जातील, याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत माहिती देताना काँग्रेसचे संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी जाहीर केले की, रायपूरमध्ये होणाऱ्या तीन दिवसीय अधिवेशन काळात पक्ष घटनेशी संबंधित काही अनिवार्य दुरुस्त्याही केल्या जातील. अधिवेशन काळात खरगे यांच्या अध्यक्षपदी निवडीवर शिक्कामोर्तब करण्याबरोबरच कार्यकारिणीच्या स्थापनेचा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे.

Nagpur Lok Sabha, Nitin Gadkari,
गडकरी हॅटट्रिक साधणार ?
sangli
सांगलीच्या निर्णयाने कार्यकर्ते अस्वस्थ; निवडणुकीवर बहिष्कार अथवा बंडखोरीची मागणी
Sharad pawar
“५६ वर्षांत मी एकही सुट्टी घेतली नाही”, शरद पवारांचं विधान चर्चेत; म्हणाले, “शेतकरी आपल्या बैलाला…”
Congress Sangli
सांगलीत काँग्रेस नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, जागा सुटण्याबाबत साशंकताच

याशिवाय पक्षातील एक मोठा वर्ग दीर्घकाळापासून कार्यकारिणी सदस्यांच्या निवडीची मागणी करत आहे याबाबत विचारले असता, वेणुगोपाल यांनी सांगितले की पक्षाच्या घटनेनुसार कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया पूर्ण होईल.

काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत घोषणा केली की रायपूर येथे होणाऱ्या तीन दिवसीय अधिवेशनात पक्ष घटनेशी संबंधित काही अनिवार्य दुरुस्त्याही केल्या जातील. अधिवेशन काळात खरगे यांच्या अध्यक्षपदी निवडीवर शिक्कामोर्तब करण्याबरोबरच कार्यकारिणीच्या स्थापनेचा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे. पक्षातील एक मोठा वर्ग दीर्घकाळापासून कार्यकारिणी सदस्यांच्या निवडीची मागणी करत आहे आणि याबाबत विचारले असता वेणुगोपाल म्हणाले की, कार्यकारिणीच्या स्थापनेची प्रक्रिया पक्ष घटनेनुसार पूर्ण केली जाईल.

सर्वानुमते ठराव करून निवडणूक घ्यायची की काँग्रेस अध्यक्षांना अधिकार द्यायचे, याचा निर्णय़ अधिवेशनातच घेतला जाणार आहे. पक्ष घटनेनुसार, काँग्रेस कार्यकारिणीच्या १२ सदस्यांची निवड करण्याची तरतूद आहे, तर १२ जणांना काँग्रेस अध्यक्षांकडून नामनिर्देशित केले जाते. वेणुगोपाल म्हणाले की, तीन दिवसीय अधिवेशनात देशाची राजकीय परिस्थिती, परराष्ट्र धोरण, अर्थव्यवस्था, महागाई-बेरोजगारी, कृषी आणि शेतकऱ्यांची स्थिती तसेच सामाजिक क्षेत्राशी निगडीत सहा विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.

या सर्व प्रश्नांबाबत अधिवेशनात ठरावही पारित करण्यात येणार आहेत. ३१ जानेवारीपासून प्रस्तावित संसदेच्या अर्थसंकप्लीय अधिवेशनाचा पहिला टप्पा संपल्यानंतर काँग्रेसचे हे पूर्ण अधिवेशन होणार आहे. सर्वसाधारण अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार असून अधिवेशनाचा पहिला टप्पा फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे.