धुळे : लाडकी बहीण योजना आणल्याने विरोधक आमच्यावर टीका करत आहेत. परंतु आम्ही रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर १७ तारखेला भगिनींच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा करणार आहोत. गुप्तचर विभागाने जिवाला धोका असल्याचे सांगितले. परंतु भगिनींच्या राख्यांचे सुरक्षाकवच असताना आपणास कुठलाही धोका नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेचे सोमवारी सकाळी धुळे शहरात जोरदार स्वागत झाले. शहरातील जेलरोडवर आयोजित महिला मेळाव्यात अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेवरच अधिक भर दिला. जनसन्मान यात्रेनिमित्त सर्वत्र महिला-भगिनींकडून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. त्यांचे प्रेम पाहून आम्ही भारावलो आहोत. यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी जाणीवपूर्वक शेतकरी, महिला, युवक, युवतींशी बोललो. सर्व घटकांसाठी नवीन काय योजना आणता येतील, याबाबत चर्चा केली. त्यांचे दु:ख समजून घेतले. राज्याचा अर्थमंत्री म्हणून जे शक्य ते सर्वकाही करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामुळे या चांगल्या योजना आणू शकलो, असे ते म्हणाले.

Ajit Pawar On Sharad Pawar
Ajit Pawar : “मी आता ठरवलंय, शरद पवारांबाबत…”, अजित पवार नेमकं काय म्हणाले?
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Rajiv Kumar on Maharashtra Assembly Election Date Schedule in Marathi
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचं मोठं विधान, म्हणाले…
Amol mitkari jaydeep apte 1
Amol Mitkari : “जयदीप आपटे याचा त्या पुतळ्याद्वारे छुपा अजेंडा…”, मिटकरींचे गंभीर आरोप; देवेंद्र फडणवीसांना म्हणाले…
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
What Sharad Pawar Said About Raj Thackeray?
Sharad Pawar : ‘राज ठाकरेंची गाडी तुम्ही अडवायला सांगितली?’, या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले; “त्यांनी माझं नाव…”
Manoj Jarange Patil On Assembly Elections
Manoj Jarange : “पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात सुपडा साफ करणार, तर मुंबईत…”, मनोज जरांगेंचा इशारा
Ajit Pawar
Ladki Bahin Yojana : रवी राणांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या विधानावर अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या…”

हेही वाचा >>>लोकसभेतील यशानंतर मराठवाड्यातील काँग्रेसमधील मरगळ गायब

आशीर्वाद द्या, अन्यथा पंधराशे रुपये परत घेईन!’

विधानसभेसाठी तुमचे आशीर्वाद हवेत. आमचे सरकार आले, तर तुम्हाला देण्यात येणारे पैसे दीड हजारांवरून तीन हजार करू. पण ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही, त्यांच्या खात्यातून दीड हजार रुपये काढून घेऊ. तुमचा भाऊ म्हणून मी हे सांगत आहे, असे धक्कादायक वक्तव्य बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत.