समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी गुरुवारी सांगितले की बिहारमध्ये जेडीयुने एनडीए सोडून आरजेडीशी मैत्री करणे हे एक सकारात्मक चिन्ह आहे आणि ही मैत्री २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला एक मजबूत पर्याय म्हणून समोर येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्यावेळी सपा भाजपासमोर आव्हान उभे करण्यासाठी पूर्ण सहकार्य करेल असे त्यांनी स्पष्ट केले.  उत्तर प्रदेशातील भाजपचे मित्र पक्षही भाजपावर खूश नाहीत आणि तेही वेगळे होतील असा दावाही अखिलेश यांनी केला. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने अपना दल (सोनेलाल) आणि निशाद पक्षाशी करार केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यांच्या पक्षाच्या २०२४ च्या योजनांबद्दल अखिलेश यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की सपा त्यांचे संघटन मजबूत आणि पुनर्रचना करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे आणि यावर्षी राष्ट्रीय अधिवेशन घेणार आहे. बिहारमधील घडामोडींचे स्वागत करताना यूपीचे माजी मुख्यमंत्री म्हणाले “मला आशा आहे की भाजपच्या विरोधात २०२४ मध्ये एक मजबूत पर्याय तयार होईल आणि लोक त्याला पाठिंबा देतील.” पर्यायाच्या निर्मितीमध्ये त्यांच्या पक्षाच्या भूमिकेबद्दल विचारले असता ते म्हणाले “तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यावर काम करत आहेत. सध्या आमचे लक्ष राज्यात पक्ष मजबूत करण्यावर आहे.

दिल्लीत बोलताना भाजपाने विरोधकांच्या ऐक्याबाबत अखिलेश यांचे वक्तव्य फेटाळून लावले. भारतीय लोकांना माहित आहे की एच.डी देवेगौडा, आय के गुजराल आणि व्ही पी सिंग यांचा काळ गेला आहे. देशाला आता स्थिरता, विकास, प्रामाणिकपणा आणि प्रभावी नेतृत्व हवे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते पुरवून भारताची प्रतिष्ठा वाढवली आहे, असे माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले. पुढे ते म्हणाले की विरोधी पक्ष आपापसात किती समजूतदारपणा वाढवतात हे पाहणे बाकी आहे.

मुलाखतीत अखिलेश यांनी विधानसभा निवडणुकीत सपाच्या पराभवाबद्दल तसेच आझमगढ आणि रामगढ या त्यांच्या बालेकिल्ल्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत निवडणूक आयोगाच्या अप्रामाणिकपणाबद्दल बोलले. दोन जागा जिंकण्यासाठी पुरेसे प्रयत्न न केल्यामुळे अखिलेश यांच्यावर हल्ला झाला होता. देशात कोणतीही निःपक्षपाती संस्था उरलेली नाही. दबावाखाली सरकार या संस्थांकडून हवे ते मिळवत आहे,” अखिलेश म्हणाले.

ते पुढे म्हणाले की “निवडणूक आयोगाने ने खूप अप्रामाणिकपणा केला आहे. त्यांनी विरोधकांचा आवाज ऐकला नाही. मतदार यादीतून मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे कापण्यात आली. रामपूरमध्ये सपा कार्यकर्त्यांना मतदान करू दिले नाही, तर आझमगडमध्ये सपा कार्यकर्त्यांना लाल कार्ड देण्यात आले. निवडणुक झोपले होते का? त्यांनी आमच्या तक्रारींकडे का लक्ष दिले नाही? ” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akhilesh yadav said in uttar pradesh bjpsalliance party are not happy pkd
First published on: 19-08-2022 at 16:59 IST