कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मतदारसंघ निहाय आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. संभाव्य प्रबळ उमेदवारांची यादी तयार केली जात आहे. महायुती – महाविकास आघाडी या दोन्हीकडून वरकरणी संयुक्तपणे लढण्याची भाषा केली जात असली तरी पक्षांतर्गत छुप्या पद्धतीने स्वबळावर लढण्याची अंतर्गत रणनीती आखली जात आहे.

लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे सुरू झाले आहे. पावसाचा जोर वाढल्याने जाहीर हालचाली कमी झाल्या असल्या तरी पक्षीय कार्यालयाच्या पातळीवर अंतर्गत हालचालींना गती आली आहे. राज्यातील सत्तारूढ महायुती आणि विरोधी मविआ यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संयुक्तपणे सामोरे जाणार असल्याचे विधान केले आहे. इतकेच नव्हे तर निवडणुकीच्या अनुषंगाने वादग्रस्त टीकाटिपणी करणाऱ्या प्रवक्त्या, दुसरया फळीतील नेत्यांना अशी विधाने न करण्याबद्दल तंबी देण्यात आली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?
Firing at the house of an independent candidate in Jalgaon news
जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
Rakesh Mutha hair burnt in kalyan west
कार्यकर्त्यांचा अतिउत्साह उमेदवाराच्या अंगलट आला; फटाक्यांच्या ठिणगीमुळे उमेदवाराचे केस जळाले
maharashtra vidhan sabha election 2024 uncle dharmarao baba atram vs nephew ambrishrao atram in aheri assembly constituency gadchiroli print politics news
अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…
campaign will stop today
प्रचारतोफा आज थंडावणार, निवडणूक आयोगाची ‘छुप्या प्रचारा’वर नजर

हेही वाचा…सोलापूर , बार्शी कृषी बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये भाजप नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

निवडणुकीला सामूहिक ताकती द्वारे सामोरे जाऊन पुन्हा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न महायुतीकडून सुरू आहे. तर महायुतीला रोखून पुन्हा सत्तेवर येण्यासाठी मविआ कटिबद्ध झाली आहे. याचवेळी महायुती आणि मविआसह अन्य पक्षांकडूनही विधानसभा निवडणुकीसाठी पक्षांतर्गत मतदार संघ निहाय उमेदवारांची चाचपणी केली जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांशी पक्षामध्ये हे चित्र दिसत असले तरी अशीच परिस्थिती अन्य जिल्ह्यांमध्ये असल्याचेही सांगण्यात येते.कोल्हापुरात ठाकरे शिवसेनेच्या निरीक्षकांनी मतदारसंघ निहाय आढाव्याचे काम याआधीच पूर्ण केले आहे. याची यादी मातोश्रीवर गेलेली आहे. संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत रविवारी संभाव्य उमेदवारांशी चर्चा केल्यानंतर मेळाव्यात रणनीती आखली जाणार आहे, असे उपनेते संजय पवार यांनी सांगितले. शिंदे सेनेचे मुंबईतील निरीक्षक शरद कणसे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होऊन सर्व १० मतदार संघात इच्छुकांची यादी निश्चित करण्यात आली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतर्गत हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा या पारंपरिक मतदारसंघातील लढण्याची तयारी सुरु आहे. इचलकरंजीमध्ये जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे.

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वच मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची यादी तयार केली असून ती घेऊन जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील व सहकारी हे शरद पवार यांना भेटीसाठी जाणार होते. पावसामुळे त्यांना थांबण्यासाठी सांगितले असून पुढील आठवड्यामध्ये आढावा बैठक होणार आहे.
काँग्रेस पक्षाने निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईतील टिळक भवन कार्यालयामध्ये एका बैठकीच्या आयोजन केले होते. विधान परिषद निवडणुकीमुळे ही बैठक स्थगित केली असून त्यानंतर जिल्हा मतदारसंघ निहाय आढावा घेण्याचे काम सुरू होईल, असे सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी, प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी नमूद केले.

हेही वाचा…पुरवणी मागण्यांचा पाऊस; अर्थसंकल्प मंजूर होताच ९५ हजार कोटींच्या मागण्या सादर, मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यासाठी १४,५९५ कोटी

भाजप आणि मनसे यांची युती होणार असल्याचे वृत्त असले तरी अधिकृत दुजोरा नसल्याने मनसेने जिल्ह्यातील सर्व १० ठिकाणी इच्छुकांना कमला लागल्याच्या सूचना दिल्या आहेत. याच आठवड्यात इच्छुकांची यादी राज ठाकरे यांना पाठवली जाणार असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष पुंडलिक जाधव यांचे म्हणणे आहे. समाजवादी पक्षाने मविआकडे ३५ जागा मागितल्या असून निर्णयाची प्रतीक्षा आहे. तोवर इचलकरंजी, राधानगरी, चंदगड येथे इच्छुकांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या असल्याचे प्रदेश महासचिव शिवाजीराव परुळेकर यांनी सांगितले.

हेही वाचा…कायदेशीर मत आजमावल्यावरच ‘सगेसोयरे’वर अंतिम अधिसूचना ; विरोधकांचा सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार

दरम्यान, भाजप आणि अजित पवार गटाचे मात्र महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची तयारी ठेवली आहे. राज्य अर्थसंकल्पातील विकासाच्या योजना मतदारांपर्यंत पोहचवण्यावर भर दिला आहे. जागावाटपावर उघड भाष्य केले जाणार नाही , असे भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव आणि अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी स्पष्ट केले.