अंबरनाथः अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यापुढे येत्या निवडणुकीत स्वपक्षियांचेच मोठे आव्हान असणार आहे. गेल्या काही वर्षात अंबरनाथ शहरात शिवसेनेत दोन गट उघड असून ते एकमेकांवर कुरघोडीचे प्रयत्न कायमच करत असतात. गेल्या काही दिवसांपासून आमदार डॉ. किणीकर यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी विरोध गटाकडून सोडली जात नाही.

लोकसभा निवडणुकीत अंबरनाथमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मिळालेली मते लक्षणीय असून त्यामुळे विधानसभेत किणीकरांचा मार्ग खडतर असल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्रीपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ ही एकमेव जागा शिवसेनेकडे आहे. त्यामुळे ती राखण्यासाठी येथे प्रतिष्ठा पणाला लावली जाणार यात शंका नाही.

Eknath shinde appreciated mla Sanjay Gaikwad
मुख्यमंत्र्यांकडून गायकवाड यांचे कौतुक, उपमुख्यमंत्र्यांचे खडेबोल
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
student wing agitation
‘वंचित’कडून महाविकास आघाडी समर्थक विचारवंत लक्ष्य
Jammu and Kashmir state status marathi news,
“जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यास कटीबद्ध”, श्रीनगरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
western Maharashtra vidhan sabha
पश्चिम महाराष्ट्रात मविआची मुसंडी?
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Jammu and Kashmir Assembly Elections 2024
काश्मीर बदल रहा है! शून्य मतदान होणाऱ्या गावात यंदा प्रचंड मतदान

हेही वाचा >>> कधीकाळी मतदानावर बहिष्कार टाकणाऱ्या गावात यंदा मतदानासाठी लांबच लांब रांगा; जम्मू-काश्मीरमध्ये बदलाचे वारे?

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. उल्हासनगर शहराचा काही भाग या विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. त्यामुळे उल्हासनगरच्या मतांवर अंबरनाथ विधानसभेची आघाडी ठरते. गेल्या तीन वेळा आमदार असलेले डॉ. बालाजी किणीकर यंदाही विधानसभेच्या निवडणुकीत शिंदे गटाकडून रिंगणात असणार हे जवळपास निश्चित मानले जाते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मदतीने मतदारसंघात विविध प्रकल्पांचा पाया रचला गेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मागासवर्गीयांचे वसतीगृह अशा विविध प्रकल्पांची उभारणी किणीकरांसाठी जमेची बाजू आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अंबरनाथची लढाई डॉ. किणीकर यांच्यासाठी तितकीशी सोपी राहिलेली नाही. लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना ९३ हजार ६७० मते मिळाली. त्याचवेळी शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर राणे यांना ५८ हजार ०२८ मते मिळाली. शिवसेनेच्या फुटीनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत ही मते शिंदे गटासाठी धक्का मानली गेली. ही मते ठाकरे गटाला आघाडी मिळवून देण्यात फायदेशीर ठरली नसली तरी खासदार डॉ. शिंदे यांची आघाडी कमी करण्यात यशस्वी ठरली. विशेष म्हणजे ठाकरे गटाचा प्रचार या मतदारसंघात तितकाचा प्रभावी नव्हता. त्यातही गेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. शिंदे यांच्या विरोधी उमेदवार बाबाजी पाटील यांना ३१ हजार १४३ मते होती. त्यामुळे यंदा अंबरनाथमध्ये विरोधी पक्षांचे मतदान तुलनेने वाढले आहे.

हेही वाचा >>> मंत्री सत्तार व रावसाहेब दानवे यांच्यातील वाद टोकाला

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. किणीकर यांनी कॉंग्रेसचे रोहित साळवे यांचा २९ हजार २९४ मतांनी पराभव केला. तर २०१४ च्या निवडणुकीत त्यावेळी भाजपात असलेले राजेश वानखेडे यांचा २०४१ मतांनी पराभव केला होता. आता ठाकरे गटाकडून राजेश वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून कॉंग्रेसचे रोहित साळवेही यासाठी प्रयत्नशील आहेत. महाविकास आघाडीत ही जागा कुणाच्या पारड्यात पडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. विरोधकांसह डॉ. किणीकर यांच्यापुढे स्वपक्षियांचेही तितकेच आव्हान असेल. शहरात शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर आणि डॉ. किणीकर यांच्यात कायमच संघर्ष असतो. आता वाळेकर विविध मुद्द्यांवरून डॉ. किणीकर यांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे डॉ. किणीकर यांना विरोधकांसह स्वपक्षियांचेही आव्हान पेलावे लागणार आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर आमदार डॉ. किणीकर शिंदे यांच्यासोबतच होते. तर अरविंद वाळेकर यांनी शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी मोठा वेळ घेतला होता. त्या काळात हा संघर्ष वाढला होता. आता शिवसेनेला विधानसभेसाठी आणि त्यानंतर पालिका निवडणुकांसाठी छुपे विरोध मोडून काढण्याचे आव्हान आहे. त्याचवेळी कल्याण लोकसभेतील एकमेव शिवसेनेची जागा वाचवण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतिष्ठा पणाला लावतील यात शंका नाही.