उमाकांत देशपांडे

मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडचे असलेल्या अमित साटम यांनी २००० मध्ये एमबीए (एचआर) चे शिक्षण पूर्ण केले. एका नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीत चांगली नोकरीही लगेच मिळाली. पण राजकारणाची आवड असल्याने नोकरी करीत असतानाच अंधेरीमध्ये भाजपचे काम सुरु केले आणि विभाग (वॉर्ड) सरचिटणीस झाले. सुमारे चार वर्षांनंतर नोकरीचा राजीनामा देऊन साटम यांनी पूर्णवेळ भाजपचे काम सुरु केले. ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे सचिव म्हणून दोन वर्षे काम केले व पुढे अंधेरी भाजप तालुका अध्यक्ष झाले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

त्यानंतर २००७ मध्ये महापालिका निवडणूक लढविली, पण त्यात पराभव झाला. मुंबई युवा मोर्चाचे सरचिटणीस आणि अध्यक्ष म्हणून काम केले. पुढे महापालिकेची निवडणूक २०१२ मध्ये दुसऱ्यांदा लढविली व निवडून आले. भाजप-शिवसेना युती २०१४ मध्ये तुटल्यावर साटम यांना अंधेरी (प.) मधून विधानसभेची निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आणि ते निवडून आले. आमदारकी सांभाळत असताना ते पक्षाचे जिल्हाध्यक्षही होते. साटम यांनी २०१९ मध्येही विधानसभेची निवडणूक लढविली आणि ते दुसऱ्यांदा निवडून आले.

हेही वाचा: अब्दुल सत्तारांच्या मदतीला एमआयएम; शिवसेनेवरच आरोप

आमदार आणि नगरसेवक पदाच्या कारकीर्दीत साटम यांनी अनेक सामाजिक कामे केली असून जनतेचे प्रश्न मार्गी लावले आहेत. जुहू चौपाटी सुशोभीकरण, मतदारसंघात ४५ उद्याने विकसित करणे, ७५ सार्वजनिक शौचालयांची उभारणी केली. मुंबईतील रस्त्यांवर एलईडी पथदिव्यांसाठी साटम यांनी २०१४ मध्ये अंधेरीत उपोषण व आंदोलन केले होते. रस्तेबांधणी करताना भूमिगत वाहिन्यांसाठी (डक्ट) साटम यांनी आग्रह धरला होता.

हेही वाचा: भाजप-एमआयएममधील श्रेयवादात धुळ्यातील रस्त्यांचे भाग्य उजळणार

रस्तेबांधणी, सुशोभीकरणासह अन्य कामांच्या निविदा, महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य सरकारने आणि महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचारांची अनेक प्रकरणे उघड करुन साटम यांनी विधीमंडळात आवाज उठविला आहे व रस्त्यावर उतरुन आंदोलनेही केली आहेत. अंधेरीत मोठा नवरात्रोत्सव आणि अन्य सामाजिक उपक्रमांचे आयोजनही त्यांनी केले आहे.