कलम ३७० रद्दबातल ठरवण्याच्या निर्णयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्यांदाच जम्मू काश्मीर भागात एका सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी तीन घराण्यांमुळेच जम्मू-काश्मीरचा परिसर दहशतवादी कारवायांमुळे धुमसत राहिला, अशी टीका केली. मागील ७० वर्षांमध्ये ४२ हजार सामान्य नागरिकांना येथे जीव मगवावा लागला. या मृत्यूंसाठी कोण जबाबदार आहे, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अमित शाहांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यातून भाजपाची आगामी विधासभा निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती!

अब्दुल्ला, मुफ्ती आणि गांधी या तीन घरण्यांकडे अमित शाह यांचा रोख होता. हे तिन्ही घराणे जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीला कारणीभूत आहेत, असे अमित शाह यावेळी म्हणाले. या पार्श्वभूमीवर येथे कोणत्या वर्षी किती दहशतवाद्यांना कंटस्नान घातले गेले. तसेच किती नागरिकांचा मृत्यू झाला यावर एक नजर टाकुया.

हेही वाचा >>> ‘वंदे भारत एक्स्प्रेसला’ पुन्हा अपघात; काल म्हशींच्या कळपाला धडक, आज…

१९९०-२००१ : परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीर भागात १९९० ते १ डिसेंबर २००१ या कालावधित एकूण ५१७८ दहशतवादाशी संबंधित कारवाया करण्यात आल्या. या कारवायांदरम्यान एकूण ९७१८ नागरिकांचा मृत्यू झाला. तर ३०५३ सुरक्षा जवानांचा कारवाईमध्ये मृत्यू झाला. या कारवायांमध्ये एकूण १४३५६ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. यामध्ये २३५८ परदेशी दहशतवादी होते. या काळात १९९६ साली सर्वाधिक म्हणजेच १३३६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. २००१ साली सर्वाधिक म्हणजेच २०२० दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते.

हेही वाचा >>> राष्ट्रवादी वगळून शिवसेना आणि काँग्रेसशी युतीसाठी प्रकाश आंबेडकर तयार

२००२ साली १००८ नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर ४५३ सुरक्षा जवान शहीद झाले होते. या साली १७०७ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्रालयाने जम्मू काश्मीरमधील कारवायांसंदर्भात २००४ साली एक वार्षिक अहवाल जारी केला होता. या अहवालानुसार दहशतवादाविरोधातील कारवायांदरम्यान २००२ ते २००३ या काळात ९९४ नागरिकांचा मृत्यू झाला होता. २००३-२००४ या काळात हा आकडा ७५३ वर होता. २००२-२००३ साली ४३३ सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला. तर २००३-२००४ या हा आकडा ३२६ होता. २००२-२००३ साली १५३६ तर २००३-२००४ साली १४९१ दहशदवाद्यांना ठार करण्यात आले होते.

हेही वाचा >>> निवडणूक आयोगाच्या सुनावणीआधी बावनकुळे-शेलार यांची शहांशी चर्चा

२००४ ते २००९ या काळात १९८० नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर विशेष दलाच्या ८७० जवानांचा या काळात मृत्यू झाला होता. २००४ ते २००९ या कालावधित ३५३४ दहशतवादी ठार झाले होते. २०१० साली सुरक्षा दलाचे जवान, नागरिक तसेच दहशतवाद्यांच्या मृत्याचा आकडा अनुक्रमे ६९, ४७ आणि २३२ असा आहे. २०११ साली सुरक्षा दलाचे ३३ जवान शहीद झाले. ३१ नागरिकांचा मृत्यू झाला. तर १०० दहशतवादी ठार झाले होते. २०१२ साली सुरक्षा दलाचे १५ जवान, १५ नागरिकांचा मृत्यू तर ७२ दहशतवादी ठार झाले होते. २०१३ ते २०१७ या कालवधित सुरक्षा दलाचे ३०१ जवान शहीद झाले. ११५ नागरिकांचा मृत्यू झाला. तर ६४८ दहशतवादी या काळात ठार झाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah criticizes abdullah mufti gandhi family for jammu kashmir militancy prd
First published on: 07-10-2022 at 22:08 IST