scorecardresearch

Premium

विरोधकांची ‘संधीसाधू आघाडी’, बिहारमध्ये आम्ही ४० जागांवर जिंकणार- अमित शाह

नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव हे तेल आणि पाणी यांच्या मिश्रणाप्रमाणे आहेत. ते कधीही एकत्र येऊ शकत नाहीत, असे अमित शाह म्हणाले.

amit shah
अमित शाह (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी आघाडी केली आहे. या आघाडीला विरोधकांनी इंडिया असे नाव दिले आहे. सध्या या आघाडीत जागावाटपावर चर्चा केली जात आहे. ही चर्चा राज्य स्तरावर होणार आहे. दरम्यान, विरोधकांना तोंड देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनीही कंबर कसली आहे. भाजपाकडून इंडिया आघाडीवर भ्रष्टाचार, गैरव्यवहाराचे आरोप केले जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे बिहार दौऱ्यावर होते. त्यांनी येथे सार्वजनिक सभेदरम्यान इंडिया आघाडी तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, राजद पक्षाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यावर सडकून टीका केली.

यूपीए सरकारमध्ये भ्रष्टाचार- अमित शाह

“त्यांनी नव्या नावासह नवी आघाडी केली आहे. याआधी त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) या नावाने आघाडी केली होती. मात्र ही आघाडी असताना त्यांनी एकूण १२ लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. केंद्रात रेल्वेमंत्री असताना लालपूप्रसाद यादव यांनी भ्रष्टाचार केला. भ्रष्टाचार केल्यामुळे ते आता यूपीए नाव पुन्हा वापरू शकत नाहीत. आता ते इंडिया नावासह समोर आले आहेत,” अशी टीका अमित शाह यांनी केली.

Sudhir Mungantiwar
VIDEO : भारतात लवकरच येणार शिवरायांची वाघनखे, सामंजस्य करारावर स्वाक्षरी; लंडनच्या रस्त्यांवर ढोल-ताशांचा गजर
sanjay raut prafull patel sharad pawar
नव्या संसद भवनात प्रफुल्ल पटेल अन् शरद पवारांची भेट, ‘त्या’ फोटोवर संजय राऊत म्हणाले…
PM Narendra Modi in delhi
“जवान अतिरेक्यांशी प्राणपणाने लढत असताना…”, पंतप्रधानांच्या ‘त्या’ कृतीवर ठाकरे गटाकडून हल्लाबोल
nana patekar on naseeruddin shah
“राष्ट्रवादाच्या नावाखाली पैसे कमवणे….”, नसीरुद्दीन शाहांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नाना पाटेकरांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सत्य घटनांवर…”

अमित शाहांची लालूप्रसाद यादव, नितीश कुमार यांच्यावर टीका

नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव हे तेल आणि पाणी यांच्या मिश्रणाप्रमाणे आहेत. ते कधीही एकत्र येऊ शकत नाहीत, असेही ते म्हणाले. “राजद आणि जदयू या दोन पक्षांची युती ही पाणी आणि तेलासाराखी आहे. ते कधीही एक होऊ शकत नाहीत. मला नितीश कुमार यांना सांगायचे आहे की, तेल आणि पाणी हे कधीही एक होऊ शकत नाहीत. तेलाकडे गमावण्यासारखे काहीही नसते, पाण्याला मात्र ते खराब करते. पंतप्रधान होण्यासाठी तुम्ही ही युती केली आहे,” अशी टीका अमित शाह यांनी केली.

विरोधकांनी सनातन धर्माची आजाराशी तुलना केली- अमित शाह

बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासाळली आहे. बिहारमध्ये सध्या महायुतीची सत्ता आहे. महायुतीच्या सरकारमुळे बिहारची परिस्थिती आणखी बिकट होणार आहे, असेही अमित शाह म्हणाले. विरोधकांच्या युतीने राम मंदीर, रक्षाबंधन, जन्माष्टमी यासारख्या सणांना सुट्टी देण्यास विरोध केला. त्यांनी सनातन धर्माची वेगवेगळ्या आजारांशी तुलना केली. रामचरितमानसचाही अवमान केला, असाही आरोप अमित शाह यांनी केली. विशेष म्हणजे त्यांनी विरोधकांच्या इंडिया या आघाडीला ‘संधीसाधू आघाडी’ म्हणत हिणवले.

२०२४ साली आम्हीच निवडून येणार- अमित शाह

त्यांनी आपल्या भाषणात मोदी यांना पुन्हा निवडून द्यावे, असे जनतेला आवाहन केले “२०२४ साली नरेंद्र मोदी निवडून न आल्यास संपूर्ण सीमांचल प्रदेशात घुसखोर असतील. २०२४ साली एनडीए एकूण ४० जागांवर विजयी होईल. २०१९ सालच्या निवडणुकीत आम्ही ३९ जागांवर विजयी झालो होतो. आगामी निवडणुकीत आम्ही हा विक्रम मोडीत काढू,” असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amit shah criticizes nitish kumar lalu prasad yadav and india alliance prd

First published on: 16-09-2023 at 20:29 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×