केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. २०१९ मध्ये कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या प्रमुख कल्याणकारी योजना या ठिकाणी अधोरेखित केल्याने जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीसाठी केंद्राच्या तयारीला नवी गती मिळाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणूक आयोगाने नोव्हेंबरच्या अखेरीस पूर्वतयारी प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित असताना, आगामी उन्हाळ्यात केंद्रशासित प्रदेशात निवडणुका होतील असा वाढाता आशावाद आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. मतदार यादीची पडताळणी पूर्ण होताच निवडणुकीची तयारी पूर्ण होईल. नव्या मतदार यादीत पीओके आणि पूर्वीच्या पश्चिम पाकिस्तान तसेच संकटकाळात काश्मीर सोडलेल्यांचा समावेश अपेक्षित आहे. याशिवाय केंद्र सरकारने असेही जाहीर केले आहे की किमान १५ वर्षे जम्मू आणि काश्मीरमध्ये किमान १५ वर्षे राहणारी व्यक्ती केंद्रशासित प्रदेशाच्या डोमेसाइलसाठी पात्र असणार आहे.

निवडणूक आयोगाने अंतिम मतदारयादी तयार केल्यानंतर या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल आणि या निवडणुका संपूर्णत: पारदर्शक पद्धतीने पार पाडल्या जातील अशी हमीदेखील अमित शाह यांनी दिली.

बारामुल्ला येथील शौकत अली स्टेडियमवर बुधावारी शाह यांची सभा झाली त्यावेळी मोठ्यासंख्येने गर्दी दिसून आली. यावेळी शाह यांनी म्हटले की, “हे येथील वातावरण सामान्य असल्याचं सूचक आहे. आता आता काश्मीरमधील तरूणांना, त्यांच्या पालकांना आणि आजी-आजोबांना जो त्रास सहन करावा लागला त्या त्रासाला कधीच सामोरं जावं लागणार नाही.”

“पारदर्शक पद्धतीने निवडणुका होणार” –

निवडणूक आयोगाने अंतिम मतदारयादी तयार केल्यानंतर या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल आणि या निवडणुका संपूर्णत: पारदर्शक पद्धतीने पार पाडल्या जातील अशी हमीदेखील अमित शाह यांनी दिली.

“पाकिस्तानशी चर्चा करणार नाही” –

“काही लोक मला पाकिस्तानशी चर्चा करण्याचा सल्ला देत आहेत. पण मी त्यांच्याशी चर्चा करु इच्छित नाही. मात्र जम्मू-काश्मीरच्या जनतेशी मला बोलायचे आहे. मोदी सरकार हे दहशतवाद सहन करत नाही, तो नष्ट करते. जम्मू-काश्मीर हा देशातील सर्वात शांत प्रदेश व्हावा, यासाठी आम्ही काम करत आहोत,’’ असे शाह म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shahs jammu kashmir tour to create atmosphere for bjps upcoming assembly elections msr
First published on: 07-10-2022 at 19:12 IST