कर्नाटकमध्ये राजकीय पक्षांची उमेदवारांच्या याद्या ठरवण्याची, राजकीय नेत्यांची एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची लगबग सुरू असताना गेल्या आठवड्यात ‘अमूल’ने ट्वीट करून कर्नाटकमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा केली. त्यामुळे राजकीय वादाला आणखी एक निमित्त मिळाले आहे. ‘नंदिनी’ ही कर्नाटक दूध संघाचा प्रतिष्ठित नाममुद्रा आहे. त्याला आता अमूलच्या स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे. यावरूनच गुजरातचे कर्नाटकवर अतिक्रमण असा आरोप करीत काँग्रेस आणि जनता दलाने भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत अमूलच्या प्रवेशामुळे ‘नंदिनी’ नाममुद्रा धोक्यात आल्याची टीका काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने केली आहे, तर विरोधक या मुद्द्याचे राजकारण करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे. ‘अमूलच्या मुद्द्यावर आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. नंदिनी हा राष्ट्रीय ब्रँड आहे. तो कर्नाटकपुरता मर्यादित नाही. आम्ही नंदिनी नाममुद्रा इतर राज्यांमध्येही लोकप्रिय केली आहे. भाजपच्या कार्यकाळात राज्यातील केवळ दूध उत्पादन वाढले असे नाही तर दूध उत्पादकांना प्रोत्साहनदेखील मिळाले आहे. तसेच आमच्या काळात कर्नाटक दूध संघाच्या अनेक मोठ्या डेअरी सुरू करण्यात आल्या आहेत,’ असा दावा बोम्मई यांनी केला आहे. ‘नंदिनी’साठी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे, त्यामुळे ती लवकरच देशातील पहिल्या क्रमांकाची नाममुद्रा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

BJP and TMC
पश्चिम बंगालमध्ये टीएमसी अन् भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानावेळी राडा; एकजण गंभीर जखमी
Raj Thackeray Melava
MNS Gudi Padwa Melava : “विधानसभेच्या तयारीला लागा”, राज ठाकरेंचे खास शैलीत आदेश; म्हणाले, “गावागावांतून आलेल्या…”
wealthy MP Bhandara
मागासलेल्या भंडाऱ्याचे श्रीमंत खासदार, मेंढे दाम्पत्याकडे १०१ कोटींहून अधिक संपत्ती…
Naxalites active again in Lok Sabha election hype Brutal killing of tribal citizen in Gadchiroli
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत नक्षलवादी पुन्हा सक्रिय; गडचिरोलीत आदिवासी नागरिकाची निर्घृण हत्या

हेही वाचा – राष्ट्रवादीच्या आमदाराची भूमिका संशयास्पद

काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर ‘नंदिनी’ विकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. ‘कर्नाटक दूध संघ गुजरातच्या अमूलला विकण्याचे भाजपचे कारस्थान आता उघड झाले आहे. आधी अमित शहा त्याविषयी उघडपणे बोलले, आता केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलजे यांनी त्याला पाठिंबा दिला. ‘नंदिनीचे नुकसान, अमूलचा फायदा, बोम्मई सरकार निमूटपणे पाहत आहे. नंदिनी वाचवा, भाजपला पराभूत करा!’ असे ट्वीट सुरजेवाला यांनी केले. त्यानंतर भाजपने काँग्रेसवर शाब्दिक हल्ला चढवला. ‘अमूल म्हणजे भाजप आणि नंदिनी म्हणजे काँग्रेस असा अर्थ होतो का? तुम्ही तसा समज पसरवत आहात का? तुम्ही या पद्धतीने आमच्या शेतकऱ्यांचा, व्यवस्थांचा आणि संस्थांचा अपमान करत आहात,’ असा आरोप कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी केला.

हेही वाचा – “हिंदू अध्यात्मिक गुरूंनी मिशनरींपेक्षाही अधिक समाजसेवा केली”, सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

तर, ‘एक देश, एक अमूल, एक दूध आणि एक गुजरात हे केंद्र सरकारचे अधिकृत धोरण झाले आहे. त्यामुळे त्याच्या आधारे अमूल नंदिनीचा गळा आवळत आहे’ अशा शब्दांमध्ये माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी भाजपवर टीका केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डिसेंबर २०२२ मध्ये मंड्या येथील कर्नाटक दूध संघाच्या मोठ्या डेअरीचे उद्घाटन केले होते. त्या वेळी त्यांनी अमूल आणि नंदिनी यांनी एकत्र यावे, असे उद्गार काढले होते, त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. अमूलचे दूध आणि अन्य पदार्थांवर कन्नडिगांनी बहिष्कार घालावा, असे आवाहन काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी केले आहे. एकूणच राज्यात निवडणुकीचा रंग गहिरा होत असताना, दुधाचे राजकारणही तापत चालले आहे.