scorecardresearch

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची एकजूट – काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा

सत्तापिपासू भाजपने ईडी, सीबीआय या केंद्रीय संस्थाचा दुरुपयोग करून शिवसेनेच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडी सरकार पाडले असे नाना पटोले म्हणाले.

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची एकजूट – काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा

मधु कांबळे

मुंबईे : अधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या यांच्या आकस्मित निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलेली आहे या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला आपला उमेदवार देणार नसून महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्यामुळे सत्ता गमावल्यानंतरही भाजपच्या विरोधात अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या पाठिशी महाविकास आघाडीची ताकद उभी राहून आघाडीची एकजूट कायम असल्याचा संदेश देण्यात आला आहे.

या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जातीयवादी धर्मांध भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन झाली होती. राज्यात अडीच वर्षे या महाविकास आघाडीचे सरकार होते. या सरकारने शेतकरी कर्जमाफीसारखे अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. करोनासारख्या महाभयंकर संकटकाळात देशात सर्वोत्तम काम केले. पण सत्तापिपासू भाजपने ईडी, सीबीआय या केंद्रीय संस्थाचा दुरुपयोग करून शिवसेनेच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडी सरकार पाडले.

हेही वाचा : एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार?

महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न भाजपने केले ते यशस्वी झाले नाहीत म्हणून त्यांनी शिवसेना पक्ष फोडला. भारतीय जनता पक्षाविरोधातील या लढाईत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नसून शिवसेना पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करतील असे पटोले यांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या