अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची एकजूट - काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा |Andheri Assembly by-election mahavikas aghadi congress nana patole support shivsena | Loksatta

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची एकजूट – काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा

सत्तापिपासू भाजपने ईडी, सीबीआय या केंद्रीय संस्थाचा दुरुपयोग करून शिवसेनेच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडी सरकार पाडले असे नाना पटोले म्हणाले.

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची एकजूट – काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा

मधु कांबळे

मुंबईे : अधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या यांच्या आकस्मित निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलेली आहे या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला आपला उमेदवार देणार नसून महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्यामुळे सत्ता गमावल्यानंतरही भाजपच्या विरोधात अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या पाठिशी महाविकास आघाडीची ताकद उभी राहून आघाडीची एकजूट कायम असल्याचा संदेश देण्यात आला आहे.

या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जातीयवादी धर्मांध भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन झाली होती. राज्यात अडीच वर्षे या महाविकास आघाडीचे सरकार होते. या सरकारने शेतकरी कर्जमाफीसारखे अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. करोनासारख्या महाभयंकर संकटकाळात देशात सर्वोत्तम काम केले. पण सत्तापिपासू भाजपने ईडी, सीबीआय या केंद्रीय संस्थाचा दुरुपयोग करून शिवसेनेच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडी सरकार पाडले.

हेही वाचा : एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार?

महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न भाजपने केले ते यशस्वी झाले नाहीत म्हणून त्यांनी शिवसेना पक्ष फोडला. भारतीय जनता पक्षाविरोधातील या लढाईत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नसून शिवसेना पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करतील असे पटोले यांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
तानाजी सावंत यांचे उस्मानाबादमध्ये स्थगितीचे राजकारण; महावितरण व जिल्हा परिषदेतील कामांच्या चौकशीचेही आदेश

संबंधित बातम्या

श्रीकांत भारतीय : अभाविप कार्यकर्ता ते भाजपचे पडद्यामागील रणनीतीकार
भाजपच्या मराठा राजकारणातून विनायक मेटे वजा?
सुशीलकुमार शिंदे पुन्हा राजकीय पटलावर सक्रिय
भाजप खासदार गिरीश बापट यांच्या वाणीतून काँग्रेसची खंत !
Gujarat Election: मंदिर, दर्गा आणि आक्रमणकर्ते; पावागडमधील मंदिराचा मुद्दा भाजपासाठी महत्वाचा का आहे?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
अपत्य नियंत्रणाची शिफारस; समान नागरी कायद्यासाठी उत्तराखंड सरकारच्या समितीचा अहवाल
मुंबई: कडेकोट सागरी सुरक्षेचा नौदलाचा संकल्प; श्रीवर्धन-हरिहरेश्वर किनाऱ्यावरील बोटीमुळे सुरक्षेतील त्रुटी उघड
मुंबई: बेळगावसाठी नवस करायला मुख्यमंत्री का जात नाहीत?
५०० कोटी रुपयांच्या ‘आयफोन’ची तस्करी; कंपनी मालकाला अटक, २०० कोटींचे सीमाशुल्क बुडवल्याचा आरोप
‘काश्मीर फाइल्स’चा वाद; ‘इफ्फी’च्या तीन परीक्षकांचा लापिड यांना पाठिंबा