काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी आजअखेर काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. अनेक दिवसांपासून ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. आज काँग्रेस नेते राहुल गांधी मणिपूर येथून भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात करीत असतानाच मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडण्याचा मुहूर्त साधला आहे. काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी यानिमित्ताने भाजपावर टीका केली. ते म्हणाले, “आजच (१४ जानेवारी) देवरा यांचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचे सांगितले जाते. भारत जोडो न्याय यात्रेवरून लक्ष वळविण्यासाठी भाजपाने हा मुहूर्त साधला आहे.” द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना जयराम रमेश पुढे म्हणाले, “मिलिंद देवरा यांनी २००४ पासून चार वेळा या मतदारसंघातून निवडणूक लढविली. २०१४ आणि २०१९ साली शिवसेनेने या ठिकाणी विजय मिळवल्यामुळे ही जागा उद्धव ठाकरे गटाकडे गेली. त्यामुळे देवरा दक्षिण मुंबई लोकसभेच्या जागेवरून चिंतीत होते.”

VIDEO : मिलिंद देवरांनी शिंदेंच्या शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ घेतला हाती; म्हणाले, “मी काँग्रेस सोडेन वाटलं नव्हतं, पण…”

arvind kejriwal low calorie diet allegation by delhi lg
Arvind Kejriwal : “अरविंद केजरीवाल जाणीवपूर्वक…”, तुरुंगातील आहारावरून नायब राज्यपाल वी.के. सक्सेना यांचा गंभीर आरोप!
himanta biswa sarma on muslim majority
“२०४१ पर्यंत आसाम मुस्लीमबहुल राज्य होणार”, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा दावा!
arvind kejriwal health
“केजरीवाल कोमात जाऊ शकतात”; आप खासदाराचा दावा, आप आणि तिहार तुरुंग अधीक्षकांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत मतभेद का आहेत?
Union Minister Nitin Gadkari Goa Speech
नितीन गडकरी यांनी टोचले भाजपा नेत्यांचे कान,”चांगले दिवस आले की आपण जुन्या काळातला संघर्ष…”
ganesh naik waiting for about two and a half hours to meet minister uday samant
गणेश नाईक अडीच तास ताटकळत; मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर गंभीर आरोपांनंतर सामंतांशी चर्चेसाठी प्रतीक्षा
Dr Madhav Kinhalkar, Dr Madhav Kinhalkar Resigns from BJP, Dr Madhav Kinhalkar next political decision, Bhokar Assembly constituency, nanded, sattakaran article, Maharashtra vidhan sabha election 2024,
सूर्यकांता पाटील यांच्यापाठोपाठ माधव किन्हाळकर यांचाही भाजपाला रामराम
rahul gandhi letter to yogi adityanath
हाथरस दुर्घटनेप्रकरणी राहुल गांधींचं योगी आदित्यनाथ यांना पत्र; म्हणाले, “उत्तर प्रदेश सरकारने…”
Abused in Legislative Council over Rahul Gandhi statement
राहुल गांधींच्या वक्तव्यावरून विधान परिषदेत शिवीगाळ

द इंडियन एक्सप्रेसचे प्रतिनिधी आलोक देशपांडे यांनी मिलिंद देवरा यांच्या निर्णयाचा सखोल आढावा घेतला आहे. यामध्ये त्यांनी मिलिंद देवरा यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनची माहिती दिली आहे.

मिलिंद देवरा यांनी २००४ आणि २००९ साली दक्षिण मुंबई लोकसभेतून विजय मिळविला होता; तर २०१४ आणि २०१९ साली त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. स्वतःच्या मतदारसंघाकडे लक्ष देण्यासाठी २०१९ साली त्यांनी मुंबई अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. खासदार अरविंद सावंत हे उद्धव ठाकरे गटाकडे राहिल्यामुळे इंडिया आघाडीमध्ये ही जागा शिवसेनेकडे जाणार, असे दिसत होते. त्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही प्रयत्नशील होते. जयराम रमेश द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाले की, देवरा यांनी माझ्याशी शुक्रवारी संवाद साधला होता. दक्षिण मुंबईचा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहावा, यासाठी मी राहुल गांधींची समजूत घालावी, अशी विनंती त्यांनी केली होती. ही जागा आपल्या हातून जाऊ शकते, असे त्यांना वाटत होते. त्यांनी मला दुपारी २.४८ ला मेसेज केला. मग मी लगेचच ३.४० वाजता त्यांच्याशी चर्चा केली आणि हे सर्व त्यांनी राहुल गांधी यांना समजवावे, असे म्हणालो.

“दोन वेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला घेऊन…”, नाना पटोलेंचा शिंदे गट अन् मिलिंद देवरांना टोला

दक्षिण मुंबई लोकसभेसाठी उमेदवारी मिळणार?

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात संमिश्र असा मतदारवर्ग आहे. या ठिकाणी मुस्लीम मतदारांसह मराठी भाषक मतदारांची संख्या लक्षणीय आहे. तसेच बराचसा भाग ‘कॉस्मोपॉलिटन’ही आहे. मागच्या दोन निवडणुकांमध्ये त्या वेळच्या एकत्रित शिवसेनेच्या उमेदवाराला मतदारांनी विजयी केले. त्यामुळेच माजी केंद्रीय मंत्री देवरा हे भाजपाऐवजी एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्यास प्रवृत्त झाले असावेत. मात्र, तरीही देवरा यांना हा मतदारसंघ मिळणार का? यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. भाजपानेही या मतदारसंघावर दावा केला आहे. भाजपाकडून विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांची नावे प्रबळ दावेदार म्हणून घेतली जात आहेत. असे झाले, तर मिलिंद देवरा यांना जून व जुलै महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीतून वरच्या सभागृहात पाठविले जाऊ शकते.

मिलिंद देवरा यांनी २००४ साली पहिल्यांदा दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. त्याआधी त्यांचे वडील मुरली देवरा हे या मतदारसंघाचे बराच काळ प्रतिनिधित्व करीत होते. २००४ साली ते भारतातील सर्वांत तरुण खासदारांपैकी एक होते. तसेच राहुल गांधी यांच्या टीममधील ज्योतिरादित्य सिंदिया, आर. पी. एन. सिंह, जितिन प्रसाद व सचिन पायलट या सहकाऱ्यांपैकी देवरा एक होते. सध्या सचिन पायलट यांचा अपवाद वगळता सर्वांनीच इतर पक्षांत उड्या घेतल्या आहेत.

मिलिंद देवरांनी दिला काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; वर्षा गायकवाड म्हणाल्या, “पक्ष नेतृत्व तुमच्याशी…”

खासदार असताना देवरा यांनी अनेक संसदीय समित्यांमध्ये काम केले होते. संरक्षण, नागरी हवाई वाहतूक, नियोजन, नगरविकास, माहिती व तंत्रज्ञान आणि राज्यमंत्री म्हणूनही काम केले होते. दूरदृष्टी असलेला तरुण नेता, व्यावसायिक आणि कॉस्मोपॉलिटन नेता म्हणून आपली ओळख निर्माण करूनही २०१४ साली त्यांना मोदी लाटेत आपला मतदारसंघ राखता आला नाही. २०१९ साली भारतातील सर्वांत मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांनी त्यांना पाठिंबा देऊनही त्यांचा पराभव झाला. त्यावेळी मुंबई अध्यक्ष असलेल्या देवरा यांनी स्वतःच्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ऐन निवडणुकीत पक्षाचे पद सोडले होते.

दोन वेळा पराभव झाल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का बसला आणि तसेच मुंबई काँग्रेसलाही पुन्हा उभारी देण्यात ते अपयशी ठरले. देवरा यांची नुकतीच अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या सहखजिनदार पदावर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणात आपले स्थान निर्माण करण्यात ते अपयशी ठरले.

मिलिंद देवरा आता शिंदे गटात येणार असल्यामुळे शिंदे गटाला व्यावसायिक आणि दिल्लीतील राजकीय वर्तुळात प्रभाव टाकणारा एक महत्त्वाचा नेता गवसला आहे. सरकारमध्ये असताना आणि त्यानंतरही आर्थिक विषयांवर मिलिंद देवरा हे बऱ्यापैकी उदारमतवादी धोरण राबवीत असत.