ठरलं! अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, राजस्थानचं नेतृत्व कोणाकडे? | ashok gehlot official announced he will contest congress presidential election | Loksatta

ठरलं! अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, राजस्थानचं नेतृत्व कोणाकडे?

साधारण २२ वर्षांनंतर काँग्रेसमध्ये पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे.

ठरलं! अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, राजस्थानचं नेतृत्व कोणाकडे?
अशोक गेहलोत (फोटो- इंडियन एक्स्प्रेस)

साधारण २२ वर्षांनंतर काँग्रेसमध्ये पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अध्यक्षपद न स्वीकारण्याची भूमिका घेतल्यामुळे ही निवडणूक घेतली जात आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि खासदार शशी थरूर यांच्यात थेट लढत होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. असे असताना गेहलोत यांनी पहिल्यांदाच यावर थेट भाष्य करून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच मी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरल्यानंतर राजस्थानचे नेतृत्व कोण करणार हे काँग्रेसचे नेतृत्व ठरवेल, असेही अशोक गेहलोत म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> Congress president election: ‘तो’ काय बाबा मोठ्ठा माणूस, आम्हाला राहुलच हवेत; शशी थरुरांकडे केरळमधल्या नेत्यांचीच पाठ

राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याचे नाकारल्यानंतर साधारण अडीच दशकानंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळणार आहे. या निवडणुकीसाठी आजपासून (२४ सप्टेंबर) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ही निवडणूक लढणार असल्याची थेट माहिती पहिल्यांदाच दिली आहे. मी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवायचे ठरवलेले आहे. राजस्थानमध्ये परतल्यानंतर मी उमेदवारी अर्ज कधी भरायचा यासाठी निश्चित तारीख करणार आहे. पक्षामधील अंतर्गत लोकशाहीचा हा प्रश्न आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून आपण नवी सुरुवात करुया. देशातील सध्याची परिस्थिती पाहता एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून उभे राहण्याची नितांत गरज आहे, असे अशोक गेहलोत यांनी सांगितले.

हेही वाचा >>> सचिन पायलट यांची इच्छा पूर्ण होणार का ?

काँग्रेसमधील अन्य नेत्यांनी ही निवडणूक लढवायचे ठरवले असल्यास माझी हरकत नाही. निकाल हाती आल्यानंतर आम्ही काँग्रेस म्हणून सोबत काम करू, असा मला विश्वास आहे. प्रबळ विरोधी पक्ष म्हणून उदयास येण्यासाठी आपल्याला आपल्या विचारधावेरच पुढे जायचे आहे. काँग्रेसला ब्लॉक, गाव, जिल्हा स्तरावर मजबूत करण्यासाठी काम करणे गरजेचे आहे, असेही गेहलोत यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> बाळासाहेब ठाकरे ४६ वर्षे तर करुणानिधी ५० वर्षापेक्षा अधिक पक्षाचे प्रमुख

यावेळी त्यांनी राजस्थानमधील काँग्रेसच्या नेतृत्वावरही भाष्य केले. मी जर काँग्रेसचा अध्यक्ष झालो तर राजस्थान काँग्रेसची जबाबदारी कोणाला सोपवण्यात येणार, हे आमचे प्रभारी सरचिटणीस अजय माकन आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी ठरवतील, अशी माहिती गेहलोत यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
बाळासाहेब ठाकरे ४६ वर्षे तर करुणानिधी ५० वर्षापेक्षा अधिक पक्षाचे प्रमुख, पक्षाचा कायमस्वरुपी अध्यक्ष नेमणे हे लोकशाही विरोधीच, निवडणूक आयोगाची भूमिका

संबंधित बातम्या

दादा भुसेंच्या पुत्राच्या वाढदिवस फलकांनी भाजप अस्वस्थ
भाजप-संघनिष्ठ एकनाथ
सोलापुरात शिवसेनेकडे पक्षाऐवजी सत्तेचे निष्ठांवत अधिक
खासदारकी भूषवली, उच्चशिक्षित चेहरा; पण दिल्ली अबकारी कर धोरण गैरव्यवहारात नाव आल्याने के. कविता भाजपाच्या रडारवर
पूनम महाजन यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र; भाजप नेत्यांनाही टोले

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“या बिल्डरच्या मदतीने शिंदेंनी आमदारांना सुरतला नेलं! खोके व्यवस्थेतील खोके याच बिल्डरचे”; शिवसेनेचा खळबळजनक दावा
Gujarat Election Phase 2 : गुजरातमध्ये आज दुसऱ्या टप्प्याचे मतदान; पंतप्रधान मोदी अहमदाबादमध्ये बजावणार मतदानाचा अधिकार
लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : मासिक पाळी बंद होण्याचा काळ कोणता?
“‘अरे’ ला ‘कारे’ करण्याची हिंमत असती तर भाजपावाल्यांनी…”; शिवसेनेचा BJP सहीत CM शिंदेंवर हल्लाबोल
मुंबई: शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत भाजप आमदाराचे अज्ञान; विरोधी पक्ष आक्रमक झाल्याने दिलगिरी