नंदुरबार : राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या अक्कलकुवा-अक्राणी या विधानसभा मतदारसंघातून सात वेळा काँग्रेसचे वर्चस्व कायम ठेवणारे के. सी. पाडवी यांना यंदा विरोधकांबरोबरच पक्षांतर्गत नाराजीला तोंड द्यावे लागत आहे. सलग ३५ वर्षे आमदार असूनही मतदारसंघातील विकासाचा अनुशेष आणि त्यातच आमश्या पाडवी यांच्यासारख्या पारंपरिक विरोधकासह माजी खासदार डॉ. हिना गावित, माजी मंत्री पद्माकर वळवी हे मातब्बर रिंगणात असल्याने पाडवी यांच्यासाठी निवडणूक आव्हानात्मक मानली जात आहे. लोकसभा निवडणुकीतील मुलीच्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी मंत्री विजयकुमार गावित यांनी सारी ताकद पणाला लावल्याचे चित्र आहे.

अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुत्र गोवाल पाडवी नंदुरबार मतदारसंघातून विजयी झाल्यानंतरही के. सी. पाडवी यांच्यासाठी ही विधानसभा निवडणूक अवघड मानली जात आहे. अक्कलकुवा मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जात असला तरी यातील अक्राणी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेने घेतलेली आघाडी ही पाडवी यांच्यासाठी चिंताजनक आहे.

Kamathi Vidhan Sabha Constituency President Chandrasekhar Bawankule Nominated
लक्षवेधी लढत: कामठी : भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Mankhurd  Shivajinagar Muslim community in confusion print politics news
मानखुर्द- शिवाजीनगरात मुस्लीम समाज संभ्रमात
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
Srigonda Constituency BJP election Assembly Election 2024 print politics news
लक्षवेधी लढत: श्रीगोंदा : बंडखोरीमुळे चुरशीची लढाई
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

हेही वाचा >>>आश्वासनं देण्याची चढाओढ, झारखंडमझ्ये भाजपा-इंडिया आघाडीत वेगळीच स्पर्धा!

प्रत्येक विधानसभा निवडणुकीत अक्कलकुवा मतदारसंघात विरोधक वेगवेगळे लढत असल्याने मतविभाजनाचा फायदा पाडवी यांना होत आला आहे. यंदाची निवडणूकही चौरंगी होणार आहे. त्यामुळे पुन्हा मतविभागणी मदतीला धावून येईल, असा भरवसा पाडवी यांना असला तरी त्यांच्या निवडणुकीची धुरा सांभाळणारे अनेक कार्यकर्ते दूर गेले आहेत. रतन पाडवी, प्रताप वसावे, नटवर पाडवी यांसारखे दिग्गज सध्या विरोधकांच्या गोटात आहेत.

के. सी. पाडवी यांच्या मुलाकडून लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी माजी खासदार डॉ. हिना गावित या भाजपला सोडचिठ्ठी देत थेट अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्या आहेत. हे कमी की काय, पाडवी यांचे एकेकाळचे सहकारी पद्माकर वळवी हे ‘भारत आदिवासी पार्टी’च्या माध्यमातून उभे ठाकले आहेत.

हेही वाचा >>>ऐरोलीच्या बंडाला ‘ठाण्या’ची साथ ?

निर्णायक मुद्दे

● मविआ’चे उमेदवार आमदार के. सी. पाडवी यांचा कमी होत गेलेला संपर्क, नंदुरबारपेक्षाही मुंबईतच अधिक वास्तव्य असल्याचा आरोप होत असला तरी निवडणूक जिंकण्याची हातोटी पाडवी यांना आहे.

● लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून त्यांचे पुत्र गोवाल पाडवी यांना जवळपास ४५ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. सहा महिन्यांपूर्वीचा हा निकाल पाडवी यांच्यासाठी नक्कीच दिलासा देणारा आहे.

● सांगता येण्यासारखा एकही प्रकल्प मतदारसंघात न येणे, ही पाडवींसाठी दुखरी नस आहे.

Story img Loader