scorecardresearch

लातूरमधील औशात ग्रामीण मतपेढी बांधणीचा नवा मार्ग, आमदार निधीतून एक हजार किलोमीटरचे शेतरस्ते

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अभिमन्यू पवार हे स्वीय सहायक म्हणून काम करत होते. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने त्यांना औसा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली व ते काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर यांचा पराभव करत निवडून आले.

abhimanyu pawar
लातूरमधील औसाचे आमदार अभिमन्यू पवार (संग्रहीत छायाचित्र)

प्रदीप नणंदकर

ग्रामीण भागात शेताला रस्ता नाही, या कारणामुळे भांडणांचे प्रमाण वरचेवर वाढत असल्याने त्यावर उपाययोजना करण्यासाठी औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आमदार निधीतून एक हजार किलोमीटरचे शेतरस्ते केले आहेत. ग्रामीण मतपेढी बांधणीचा एक मार्ग यानिमित्ताने राजकीय पटलावर आला आहे.

या शेत रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादित केलेला शेतीमाल शहरात पोहोचविण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. या रस्त्यांचे लोकार्पण शनिवारी (दि. ४) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय खते व रसायने राज्यमंत्री भगवंत खुब्बा यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त एक हजार किलोमीटरच्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा होतो आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अभिमन्यू पवार हे स्वीय सहायक म्हणून काम करत होते. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने त्यांना औसा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली व ते काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर यांचा पराभव करत निवडून आले. औसा विधानसभा मतदारसंघात औसा तालुका व निलंगा तालुक्यातील एकूण १६२ गावे आहेत. ६५ गावे निलंगा तालुक्यातील आहेत. शेतकऱ्यांची प्रमुख समस्या ही शेताला जाण्यासाठी रस्ता नसणे ही असल्याचे लक्षात आल्यानंतर निलंगा तालुक्यात २६७ किलोमीटर तर औसा तालुक्यात ६६६ किलोमीटर असे ९३३ किलोमीटरचे शेतरस्ते काम पूर्ण झाले आहे. उर्वरित पंधरा दिवसांत ६७ किलोमीटरचे काम पूर्ण करून एक हजार किलोमीटरचा टप्पा पूर्ण करणार असल्याचे अभिमन्यू पवार यांनी सांगितले.

जनतेशी नाळ तुटलेल्या महाराष्ट्रातील वासनिकांना राज्यसभेची संधी दिल्याने नाराजी

सार्वजनिक बांधकाम विभाग, नरेगा या योजनेमधून रस्त्याचे कच्चे काम व त्यानंतर मजबुतीकरणाचे काम केले जात आहे. रस्त्याबरोबर शासकीय योजनेतून फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट ठरवले असून एक हजार हेक्टरवर फळबाग लागवडही पूर्ण करण्यात आली आहे. जनावरांच्या गोठ्याची योजना लक्षात घेऊन एक हजार गोठ्यांचे लोकार्पण फडणवीस यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. आपल्या मतदारांना खूष करण्यासाठी, मतपेढी बांधण्यासाठी आमदार-खासदार वेगवेगळी शक्कल लढवत असतात. त्यात आता या शेतरस्त्यांच्या कामांची भर पडली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-06-2022 at 15:09 IST

संबंधित बातम्या